एक्स्प्लोर
आधारसंलग्न नसलेली 'ती' बँक खाती 30 एप्रिलपासून ब्लॉक
नवी दिल्ली : करभरणा आणि मोबाईल सीम कार्डसाठी 'आधारसक्ती' केल्यानंतर बँक खाती धारकांनाही आधार आवश्यक होण्याची चिन्हं आहेत. जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत बँकेत उघडण्यात आलेली खाती ग्राहकांना आधारशी संलग्न करावी लागणार आहेत.
जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत बँकेत खाती उघडलेल्या ग्राहकांना 30 एप्रिलपर्यंत केवायसी (नो युअर कस्टमर) डॉक्युमेंट आणि आधार नंबर बँकेत नोंद करावा लागणार आहे. जे ग्राहक नोंदणी करण्यास असमर्थ ठरतील, त्यांची बँक खाती ब्लॉक करणार असल्याचं आयकर विभागाने जाहीर केलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारत आणि अमेरिकेत 2015 मध्ये झालेल्या करारानुसार विदेशी कर अनुपालन कायदा म्हणजेच Foreign Tax Compliance Act (FACTA) शी जुळवून घेण्यासाठी ही पावलं उचलण्यात येत आहेत. यामुळे करचुकव्यांची माहिती दोन्ही देशांना सहज उपलब्ध होणार आहे. संबंधित कागदपत्रं जमा करण्यास अयशस्वी ठरलेल्या ग्राहकांची खाती बँक ब्लॉक करु शकते, म्हणजेच त्यांना खात्यावरुन कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement