एक्स्प्लोर
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक
नवी दिल्ली: आता ज्येष्ठ नागरिकांना सिनिअर सिटीझनच्या कोट्यातील तिकीटावरील सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी तिकीट बुक करताना आधार कार्ड दाखवले नाही, तर सिनिअर सिटिझन कोट्यातील सवलतीपासून त्यांना मुकावे लागणार आहे. रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर तिकीट बुकिंग करताना, किंवा ई-तिकिट बुकिंग करताना दोन्हीवेळीस हा नियम लागू असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध केला आहे.
अन्यथा 50 टक्क्यांची सवलत मिळणार नाही
त्यामुळे जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकिट काऊंटरवर सिनिअर सिटिझनचे तिकिट बुक करत असाल, तर तुम्हाला आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकाने आपला आधार कार्ड नंबर दिल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल, पण ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी 50 टक्क्याची सवलत मिळणार नाही.
1 डिसेंबरपासूनच ही सुविधा उपलब्ध
दरम्यान, ही सुविधा 1 डिसेंबरपासूनच सुरु करण्यात आली असून, 1 डिसेंबरपासून 31 मार्च अखेर रेल्वे प्रवासासाठी ज्यांनी तिकीट बुक केले असेल, त्यांना आपला आधार कार्ड नंबर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन व्हेरिफाईड करता येणार आहे. पण 1 एप्रिलनंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटासाठी आधार कार्ड बंधनकारक असेल.
महिला-पुरुषांसाठी एकच नियम
रेल्वे विभागाच्यावतीने 60 वर्षावरील पुरुष हे ज्येष्ठ नागरिक म्हणून गणले जात असल्याने, त्यांना रेल्वे तिकीटात 40 टक्के सुट मिळते. तर महिलांसाठी ही वयोमर्यादा 58 असून महिला ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सुट मिळते. पण नव्या अध्यादेशानुसार 1 एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळवण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
या नियमाचे फायदे काय?
रेल्वे विभागाच्या या नव्या नियमामुळे रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर चाप बसेल. कारण सध्या तिकीटांचा काळाबाजार करणारे कोणत्याही डमी नावाने रेल्वेची तिकीटे आरक्षित करुन चढ्या दराने विकतात. या निर्णयाचा दुसरा फायदा म्हणजे, आयआरसीटीसी या रेल्वे विभागाच्या संकेत स्थळावरुन 1 जानेवारीपासून आधार कार्डचा नंबर संकलित करण्यास सुरुवात होईल. यातून एक अशी ऑनलाईन सिस्टीम बनवण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून रेल्वे प्रवाशाचा आधार नंबर दिल्यानंतर त्याचे सर्व डिटेल तत्काळ मिळतील. यामुळे ऑनलाईन फॉर्म भरताना प्रवाशांना जास्त त्रास होणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement