एक्स्प्लोर
30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्ड बनवा, नाहीतर गॅस सबसिडीला मुकाल!
नवी दिल्ली : एलपीजी गॅस सबसिडीसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. एलपीजी गॅस सिलेंडर खरेदीवर सबसिडी हवी असल्यास 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्ड बनवण्याची मुभा सरकारने दिली आहे. त्यानंतर म्हणजे 1 डिसेंबरपासून आधार कार्ड नसल्यास एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळणार नाही.
केंद्र सरकारकडून सध्या प्रत्येक कुटुंबामागे एका वर्षाला 12 गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जाते. प्रत्येक सिलेंडरवरील सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर जमा केली जाते.
एलपीजी गॅस सिलेंडरसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, "एलपीसी सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. ज्या ग्राहकांकडे आधार कार्ड नसेल, त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत आपला आधार कार्ड बनवून घ्यावा लागेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी अकाऊंटला जोडावं लागेल. अन्यथा आधार कार्ड नसल्यास सबसिडीला मुकावं लागणार आहे."
पेट्रोलिय मंत्रालयाने यासंदर्भातच पुढे सांगितले की, "जोपर्यंत आधार कार्ड उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पासबुक, व्होटर आयडी कार्ड, रेशनिंग कार्ड, किसान क्रेडिट कार्ड किंवा आधार कार्डला अर्ज केलेली पावती यांआधारे सबसिडी दिली जाईल."
एलपीजी गॅस सिलेंडर सलेंडरच्या सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा नियम आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर हे तीन राज्य वगळता देशातील सर्व राज्यांना लागू होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement