उदयपूरमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा मृत्यू, 14 डिसेंबरला झाली होती लागण
उदयपूरमध्ये एका 73 वर्षीय ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला 14 डिसेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ओमायक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले होते.
Omicron in India : दिवसेंदिवस देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशात महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधीक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनबाधीत रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता उदयपूरमध्ये देखील 73 वर्षीय ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला 14 डिसेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ओमायक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले होते. तपासणीनंतर रुग्णाचा अहवाल हा ओमायक्रॉनबाधित आला होता.
दरम्यान, ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णाचा दोन वेळेस कोरोना अहवाल निगेटीव्ह आला होता. मागच्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू होते. 4 दिवस त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. तसेच या रुग्णाला डायबेटीज आणि हायपर टेंशनचा त्रास होता. तसेच कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गेल्या 6 दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामध्ये ओमायक्रॉनचा व्हेरिएंट आढळून आला आहे. ज्यात शहरातील हाथीपोल भागातील रहिवासी असलेला 48 वर्षीय व्यक्ती 11 डिसेंबर रोजी नायजेरियातून आला होता. त्यालाही ओमायक्रॉनची लागण झली होती. तसेच त्यांच्या 46 वर्षांच्या पत्नीलाही लागण झाली होती. पण आता त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मृत्यू झालेला रुग्ण हा शहरातील सविना येथील रहिवासी असून, त्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते.
दरम्यान, महाराष्ट्रातही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 450 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 327 इतकी झाली आहे. म्हणजेच 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 450 रुग्णांपैकी 125 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: