एक्स्प्लोर

युक्रेनमध्ये मोदी सरकार, पिसोचेनमध्ये अडकेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पोहचल्या तीन बस

Students in Ukraine : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय.

Students in Ukraine : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय. तात्पुरती शस्त्रसंधी झाली असलीतरी युद्ध संपवण्याचं नाव घेत नाही. मागील दहा दिवसात युद्ध संपवण्यात जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. पिसोचेनमध्ये अडकेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सराकारने तीन बस पाठवल्या आहेत.  या बसच्या मदतीने भारतीयांना Pisochyn मधून युक्रेनच्या बॉर्डरवर  (Ukraine border) आणले जाणार आहे. विदेश मंत्रालयाकडून याबाबतची माहिती दिली आहे. 
 
विदेश मंत्रालयाने सांगितले की,  Pisochyn  आणि खारकीव्ह येथील पुढील काही तासांत सर्व भारतीयांना बाहेर काढणार आहोत. त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. Pisochyn  येथे तीन बस पोहचल्या आहेत. खारकीव्हमध्ये कुणीही भारतीय राहिला नसल्याची माहिती मिळाली आहे. आता सर्व लक्ष सुमीवर असणार आहे. येथे मोठी आव्हाने समोर आसणार आहे. कारण सुमीमध्ये अद्याप युद्ध सुरु आहे. त्यामुळे बस अथवा इतर साधनांची सुविधा करण्यास अडचणी येत आहेत. सुमीसाठी युद्धविरामची स्थिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

दरम्यान, भारतीय नागरिकांच्या  सुटकेसाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशातून शनिवारी 15 विशेष विमानांनी सुमारे 3000 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. यामध्ये 12 विशेष नागरी विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष विमानांनी आतापर्यंत 13 हजार 700 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. आतापर्यंत 55 विशेष नागरी विमानांनी भारतात परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता 11,728 झाली आहे. तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आतापर्यंत केलेल्या 10 फेऱ्यांतून  युक्रेनच्या शेजारी देशांसाठी 26 टन मदत साहित्य नेले आणि 2056 भारतीय नागरिकांना परत आणले.

हवाई दलाच्या सी-17 या प्रकारच्या, अवजड माल वाहून नेऊ शकणाऱ्या 3 विमानांनी काल हिंडन हवाई तळावरून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी उड्डाण केले आणि ही विमाने शनिवारी सकाळी या तळावर परतली. या विमानांनी रुमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंड या देशांतून 629 भारतीय नागरिकांना परत आणले. या विमानांनी जाताना या देशांसाठी भारतातून 16.5 टन मदत सामग्री देखील नेली होती. एक नागरी विमान वगळता इतर सर्व नागरी विमाने आज सकाळी देशात परतली. कोशीचेहून निघालेले हे एक विमान आज संध्याकाळी उशिरा नवी दिल्ली येथे पोहोचेल असा अंदाज आहे. आज भारतीयांना मायदेशी घेऊन येणाऱ्या नागरी विमानांमध्ये बुडापेस्टहून येणाऱ्या 5, सुचावाहून येणाऱ्या 4, कोशीचेहून येणारे 1 आणि झेजोव्ह हून येणाऱ्या 2 विमानांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget