एक्स्प्लोर

Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत : आर के सिंह

Ethanol : 2021-22 या वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने (Blending of ethanol in petrol) सुमारे 2341 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.

Ethanol : सध्या केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला (Ethanol Production) प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 2021-22 या वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने (Blending of ethanol in petrol) सुमारे 2341 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. याबाबतची माहिती ऊर्जामंत्री आर के सिंह (R. K. Singh) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  देशात सध्याची वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता अंदाजे एक हजार 37 कोटी लिटर आहे.

Biogas : बायोगॅस उद्योगातही 85 हजार नोकऱ्या निर्माण

दरम्यान, अक्षय ऊर्जा आणि रोजगार वार्षिक समीक्षा 2022 नुसार बायोगॅस उद्योगातही 85 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याची माहिती आर के सिंह यांनी दिली. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचे 2030 पर्यंत सुमारे एक लाख कोटी रुपयांची आयात बचत आणि सुमारे सहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे सिंह यावेळी म्हणाले.

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारचा प्रोत्साहन 

इथेनॉलचा प्रभावी वापर करण्याबाबत केंद्राने केलेल्या नियोजनामुळे इथेनॉलची ( Ethanol) वार्षिक उत्पादनक्षमता वाढली आहे. मागील वर्षी सरकारने देशातील विविध पिकांवर चालणाऱ्या 288 इथेनॉल प्रकल्पांना 18 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी मंजूर केले होते. मोलॅसिस आधारित प्रकल्पाची क्षमता 619 कोटी लिटर तर धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांची क्षमता 328 कोटी लिटरची आहे. यावर्षी तेल उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त प्रमाणात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या दृष्टीने त्यांनी ऊस आणि अन्य धान्यांवर आधारित इथेनॉल प्रकल्पाकडेही सातत्याने इथेनॉलची मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

मका आणि तांदळापासूनही इथेनॉल निर्मिती

अतिरिक्त साखरेच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस इथेनॉल निर्मितीकडे (Ethanol production) वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणे, आयातित जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, कच्च्या तेलाच्या आयात बिलामुळे परकीय चलनाची बचत करणे आणि वायू प्रदूषण कमी करणे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, गेल्या 8 वर्षात इथेनॉल उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. इंधन म्हणून वापरता येण्याजोग्या इथेनॉलची निर्मिती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकारने भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या मका आणि तांदळापासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमतही निश्चित केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ethanol production : मागील 8 वर्षात इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ, पाहा किती झालं उत्पादन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Embed widget