![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ओळखपत्राशिवाय बँकेत दोन हजारांच्या बदलण्याला विरोध; प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात
2000 Rs Note Exchange: दिल्ली उच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आरबीआय आणि एसबीआयला निर्देश देण्याची मागणी केली आहे.
![ओळखपत्राशिवाय बँकेत दोन हजारांच्या बदलण्याला विरोध; प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात 2000 Rs not can not be exchange without id proof petition regarding this is in delhi high court by Bjp detail marathi news ओळखपत्राशिवाय बँकेत दोन हजारांच्या बदलण्याला विरोध; प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/21/2cc5b6de3c246f6c7bda5d6cae6c41c91684648787318666_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
2000 Rs Note Exchange: दोन हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.
तसेच, यामध्ये आरबीआय (RBI) आणि एसबीआयला (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. कारण इतर कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करु शकणार नाही आणि यामुळे काळापैसा ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सहज पोहोचता येईल. तसेच भ्रष्टाचार आणि अवैध मालमत्ता, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या लोकांविरधोत योग्य कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
एसबीआयने दिले होते पत्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानंतर बँकांना नोटा बदलण्यासाठी योग्य ती तयारी करता यावी यासाठी विशेष वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार 23 मेपासून म्हणजेच, मंगळवारपासून नागरिकांना बँकेत जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलता येतील. त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राशिवाय नागरिकांना दोन हजारांच्या नोटा बदलून देण्याचे पत्र एसबीआयने त्यांच्या सर्व मुख्य कार्यलायांना पाठवले होते.
आरबीआयने हा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँकांकडून वेळोवेळी नियमावली जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे स्टेट बँकेसोबत इतर सर्व बँका या नियमाचे पालन करतील, अशी माहिती देखील मिळाली होती. परंतु आता याच विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिले पर्याय
आरबीआयने नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच याबाबत आरबीआयकडून कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत. आरबीआयने बँकांना नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच तुम्ही एका वेळी दोन हजारांच्या नोटा या वीस हजारापर्यंत बदलू शकता. हे पैसे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात जमा करु शकता किंवा बँकेतून नोटा बदलून घेऊ शकता. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)