एक्स्प्लोर

2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा विचार नाही : अरुण जेटली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. दोन हजार रुपयांची नवी नोट रद्द करण्याचा किंवा मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचं अरुण जेटलींनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. रोकड व्यवहारातील काळा पैसा कमी करण्यासाठी रामदेवबाबांसह अनेक जाणकार मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याची मागणी करत होते. नेमकं हेच कारण केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करताना दिलं होतं. त्यानंतरही सरकारने 2000 रुपयांची नोट नव्याने जारी केली होती. त्यावेळी अनेकांनी 2000 रुपयांची नोट ही तात्पुरती सोय असल्याचा बचाव केला होता. मात्र आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या लोकसभेतील लेखी उत्तराने ही नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. याच लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या 500 आणि हजाराच्या 12.44 लाख कोटी रुपयांच्या नोटा 10 डिसेंबर 2016 पर्यंत जमा झाल्या आहेत. या नोटांची फेरमोजणी आणि छानणी करण्याचं काम अजून सुरु आहे. त्यानंतर या नोटांमध्ये बनावट नोटा किती ते समजणार आहे. तसंच काही नोटांची बँकात दोनवेळा मोजणी झाल्याचीही भिती आहे. त्यामुळेच फेरमोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या किती नोटा जमा झाल्या याचा निश्चित आकडा समजणार आहे. 3 मार्च 2017 पर्यंत अर्थव्यवस्थेत 12 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा आहेत. तर 27 जानेवारी 2017 रोजी अर्थव्यवस्थेतील चलनाचं मूल्य 9.921 लाख कोटी रुपये एवढं होतं, अशी माहितीही अरुण जेटलींनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget