एक्स्प्लोर

Indian Parliament attack : कॉलर पकडून जवान जीतराम यांनी झाडल्या होत्या दहशतवाद्यांवर गोळ्या  

13 डिसेंबर रोजी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आज या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाली. 40 मिनिटे चाललेल्या या थरारक हल्ल्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.

नवी दिल्ली : 2001 ला आजच्या दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला (Parliament attack 2001) केला होता. आज या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाली. हा हल्ला प्रत्यक्ष पाहिलेले आजही तो दिवस विसरू शकत नाहित. 40 मिनिटे चाललेल्या या थरारक हल्ल्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर या हल्यात सहा दिल्ली पोलीस आणि संसदेतील दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. एका कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला. 

सकाळी 11 वाजून 40 मिनिटं झाली होती. लाल दिव्यांच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला होता. कारवर गृहमंत्रालयाचं आणि संसदेचं स्टिकर असल्याने अतिशय कडक सुरक्षेचं कवच भेदून ही कार थेट संसदेच्या आवारात घुसली होती. ही कार संसदेच्या गेट नंबर 11 कडे वेगाने येत होती. पाहता-पाहता कारने 11 क्रमांकेचे गेट पार केले आणि 12 क्रमांकाच्या गेट जवळ पोहोचत होती. येथूनच राज्यसभेत जाण्याचा मार्ग होता. संसदेच्या आसपास इतर वाहनांच्या हलचाली सामान्य होत्या मात्र ही कार उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या ताफ्याच्या दिशेने पुढे चालली होती. उपराष्ट्रपतींच्या ताफ्यामुळे या कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु, या कारचा वेग कमी झाला नाही. त्यामुळे गेटवरील एएसआय जवान जीतराम कारच्या मागे धावले. त्यावेळी चालकाने कार थांबवली. तोपर्यंत एएसआय जवान जीतराम कार चालकाजवळ पोहोचले होते. थोडीही वेळ न दवडता जीताराम यांनी चालकाची कॉलर पकडली आणि आत पाहिले तर कारमध्ये होते लष्कराच्या वेषात दहशतवादी. 

जीतराम यांचा धाडशी बाणा
कॉलर पकडलेल्या चालकाने जीतराम यांना बाजूला सरक नाही तर गोळी घालीन अशी धमकी दिली. तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचे जीताराम यांना समजले होते. काही हालचाल होणार तोच जीताराम आंनी रिव्हॉल्वर काढली. तोच चालकाने गडबडीत कार सुरू केली. जीताराम कारमागेच होते. भीतीने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार समोर असणाऱ्या दगडांवर जावून आदळली. कार दगडावर आदळताच त्यातून लष्कराच्या वेषातील पाच दहशतवादी बाहेर पडले. तोच कारमागे धावणाऱ्या जीतराम यांनी आपल्या रिव्हॉल्वमधून गोळी झाडली. ती एका दहशतवाद्याच्या पायाला लागली. त्यामुळे दहशतवाद्यांनीही जीतरामच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात जीतराम जागीच गतप्राण झाले. परंतु, हल्ला करण्यापूर्वीच जीतराम सारखा जवान निधड्या छातीने समोरासमोर भिडल्याने दहशतवाद्यांचीही पुरती भंबेरी उडाली होती. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जीतराम यांनी आपला प्राण देशाला अर्पण केला होता. परंतु, आजही त्यांचा धाडशी बाणा देश विसरू शकला नाही.  

दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार 
जीतराम शहीद झाल्यानंतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबारासह हँडग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली. संसदेच्या आवारात या घटनेने एकच गोंधळ उडाला. गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजाने आतापर्यंत संसद पूर्ण दणाणून गेली होती. मुख्य गेटच्या आतमध्ये शिरल्यावर कारमधील एका दहशतवाद्याने हॅण्डग्रेनेडचा स्फोट केला आणि स्वत: ला उडवून दिलं. इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. तोपर्यंत हा दहशतवादी हल्ला असल्याचे सर्वांच्या लक्षात आलं होतं. प्रत्युत्तरादाखल आाता जवानांनीही फायरिंग सुरू केलं होतं. इतर जवानांनी वायरलेसहून तत्काळ सर्व गेट बंद करण्याचे आदेश दिले.  

दहशतवाद्यांचा खात्मा
वायरलेसवरून गेट बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे संसदेची सर्व गेट बंद झालेली होती. संसदेतील सर्व फोनलाइन्स डेड झाल्या होत्या. सुरक्षा कर्मचारी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांवर तुटून पडले होते. दहशतवाद्यांना संसदेत घुसण्यापासून रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. जवानांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तीन दहशतवादी जखमी झाले होते. परंतु, जखमी अवस्थेतच सर्व दहशतवादी संसदेच्या गेट क्रमांक 9 च्या दिशेने अत्यंत चपळाईने सरकत होते. परंतु, 9 नंबरचे गेट बंद असल्याने त्यांनी आपला मोर्चा 5 नंबर गेटकडे वळविला. जवानांचे फायरिंग सुरूच होते. दहशतवादीह पुढे सरकत जवानांच्या दिशेने गोळीबार करत होते. एखाद्या चित्रपटातील सिनसारखा थरार प्रत्यक्ष संसदेच्या आवारात सुरू होता. त्यावेळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्याचवेळी एक दहशतवादी ग्रेनेड फेकत होता. गेट नंबर 5 वरील सुरक्षा रक्षकांनी झाडलेल्या गोळीने त्याचाही खात्मा झाला. आतापर्यंत पाच पैकी चार जणांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. परंतु, अजूनही एक जिवंत होताच. स्फोटकांनी त्याचे संपूर्ण शरीर झाकले होते. संसदेत घुसून स्वत:ला उडवून देण्याच्या तो तयारीत होता. गेट क्रमांक एकमधून तो आत जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, गेट बंद होते. सर्व सहकारी मारले गेल्याने तो गोंधळून गेला होता. एक नंबर गेट बंद असल्याने संसदेत कुठून धुसायचे या विचारात असतानाच एका सुरक्षा मर्मचाऱ्याची गोळी थेट त्याच्या छातीत घुसली. त्यावेळी त्याच्या शरीरावरील स्फोटकेही उडाली आणि तोही. पाचही दहशवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.  

शंभरपेक्षा जास्त खासदार उपस्थित
हल्ला झाला त्यावेळी संसदेत शंभपेक्षा जास्त खासदार आणि माध्यमांचे प्रतिनिधी होते. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेच्या बाहेर पडल्या होत्या. परंतु, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजप नेते प्रमोद महाजन सेंट्रल हॉल आणि परिसरात होते. या सर्वांना तत्काळ संसदेतील एका गुप्तस्थळी नेण्यात आले. दरम्यान हल्ला करून सर्व खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. परंतु जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा हा कट फसला होता. 
 
अंगाचा थरकाप उडवणारा 40 मिनीटांचा थरार
एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार आणि हँडग्रेनेडसह दहशतवाद्यांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला होता. तर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला रोखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरू होते. एखाद्या चित्रपटातील थराराप्रमाणे सुरू असलेला हा प्रत्यक्षातील थरार तब्बल 40 मिनिटे सुरू होता. ज्यांनी हा 40 मिनिटांचा थरार प्रत्यक्षात पाहिला आहे ते आजही ही घटना विसरू शकले नाहीत. 

मुख्य आरोपीला फाशी

या हल्ल्याचा मुख्य आरोपी अफजल गुरु याला दिल्ली पोलीसांनी नंतर अटक केली. अफजल गुरुला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा झाली. या शिक्षेची अंमलबजावणी  9 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करलण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

... तेव्हा तुमचे खासदार सायकलवर बसून संसदेत जायचे हे तुम्ही विसरलात का? मलिकांचा फडणवीसांना टोला 

भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापिका नीना गुप्तांना रामानुजन पुरस्कार, हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गुप्ता चौथ्या भारतीय  

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget