MPs Suspended : राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठड्यासाठी निलंबन
MPs Suspended : राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्यामुळे १९ राज्यसभा सदस्य अधिवेशनाच्या या आठवड्याच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित
Rajya Sabha MPs Suspended : लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांवर (opposition) कारवाई करण्यात आली असून खासदारांचं निलंबन (Rajya Sabha MPs suspended) करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सात खासदारांस 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित (Rajya Sabha MPs suspended) करण्यात आले आहे. जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्या. राज्यसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना केल्यानंतरही विरोधकांनी न ऐकल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. संसदेच्या 256 नियमांचं (conduct in the Parliament) उल्लंघ केल्याप्रकरणी विरोधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
खासदार सुष्मिता देव (MPs Sushmita Dev) , डॉ. शंतनू सेन (Dr Santanu Sen) आणि डोला सेन ( Dola Sen) यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सहा खासदारांना आणि इतर पाच खासदारांना आठवड्याभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी, महागाईसह विविध मुद्द्यावर या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे या खासदारांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जीएसटी आणि महागाईचा समावेश होता. यामध्ये आज गुजरातमधील विषारी दारु प्यायल्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी टीएमसीकडून करण्यात आली होती. पण याबाबत चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले. सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 19 खासदारांवर आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई केली.
19 opposition Rajya Sabha MPs suspended for the remaining part of the week for storming well of the House and raising slogans https://t.co/cyLSmWIvd3 pic.twitter.com/wGvlQQLNF5
— ANI (@ANI) July 26, 2022
कोणत्या 19 खासदाराचं निलंबन झालं?
मौसम नूर
एल. यादव
व्ही. शिवादासन
अबीर बिसेवास
सुष्मिता देव
शांता छेत्री
मोहम्मद अब्दुल्लाह
एए रहीम
कनिमोझी
डॉ. शांतनू सेन
नदीम उल हक
डोला सेन