एक्स्प्लोर
धक्कादायक... दिल्लीत एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण
परिसरातल्या लोकांचे रिपोर्ट आल्यानंतर 41 जण पॉझिटिव्ह सापडल्याचं आढळल्यानंतर प्रशासनं हादरलं आहे. ज्या हरियाणा सीमेला लागून हा भाग आहे, तिथेही या घटनेनंतर अधिक काळजी घेतलीय.
नवी दिल्ली : दाटीवाटीनं घरं असलेल्या भागात योग्य काळजी घेतली नाही तर कोरोनाचा कसा भडका उडू शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण दिल्लीत पाहायला मिळालंय. दिल्लीतल्या कापसहेडा परिसरात एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दिल्लीतल्या दक्षिण पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामध्ये ज्या ठिकाणी मजूर, व इतर कामगार दाटीवाटीनं राहतात तिथं 18 एप्रिलला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यानंतर प्रशासनानं या परिसरातल्या लोकांची चाचणी केल्यानंतर 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उजेडात आलाय. कापसहेडा हा हरियाणाला लागून असलेला भाग आहे. या परिसरात काम करणारे अनेक गरीब मजूर या ठिकाणी दाटीवाटीनं राहतात.
कापसहेडाच्या ठेकेवाली गलीत जवळपास 175 खोल्या आहेत. इथे 18 एप्रिलला एक कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ही गल्ली सील केली होती. एरव्ही एका परिसरात 3 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त सापडल्यावर इमारत पूर्णपणे सील होते. पण कापसहेडामध्ये अगदी चिंचोळ्या भागात एकाला एक लागून खोल्या आहेत. जवळपास सव्वा लाख मजूर या ठिकाणी राहतात. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं एक रुग्ण सापडल्यावरच इथली संपूर्ण गली सील केली होती.
आज या परिसरातल्या लोकांचे रिपोर्ट आल्यानंतर 41 जण पॉझिटिव्ह सापडल्याचं आढळल्यानंतर प्रशासनं हादरलं आहे. ज्या हरियाणा सीमेला लागून हा भाग आहे, तिथेही या घटनेनंतर अधिक काळजी घेतलीय. दिल्लीतल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 3738 वर पोहचला आहे, तर 61 लोक बळी पडले आहेत. दिल्लीत निजामुद्दीननंतर पुन्हा एकदा एकाच परिसरातले लोक एकाचवेळी मोठ्या संख्येनं बाधित झाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीनं होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement