Project Cheetah : आज 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार, कुनो राष्ट्रीय उद्यानातील तयारी पूर्ण
Cheetahs will come to India from Africa : नामीबियामधून (Namibia) आणखी 12 चित्ते आज भारतात दाखल होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतासाठी रवाना झाले आहेत.
African Cheetahs in India : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आज (18 फेब्रुवारी) 12 चित्ते भारतात पोहोचणार आहेत. नामीबियामधून (Namibia) 12 चित्ते भारतासाठी रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, "यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी 12 चित्ते रवाना झाले असून ते शनिवारी भारतात दाखल होतील." ही दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांची भारतात येणारी दुसरी खेप आहे. याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले आहेत.
12 चित्ते भारतात दाखल होणार
दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात आणले जात आहेत. हे चित्ते आज भारतात पोहोचतील. भारतीय हवाई दलाच्या Galaxy Globemaster C17 वर 12 चित्ते देशात आणले जात आहेत. हे विमान आज सकाळी 10 वाजता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून प्रोजेक्ट चित्ता मिशन राबवलं जात आहे.
केंद्र सरकारचा 'प्रोजेक्ट चित्ता'
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, "आपला पर्यावरणीय समतोल पूर्ववत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्त्यांनी भारतात प्रवास सुरु केला आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान शनिवारी त्यांना मायदेशी आणणार आहे. चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येणार आहे." दरम्यान, ही चित्त्यांची दुसरी खेप आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2022 रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना सोडण्यात आले होते.
#WATCH | 12 Cheetahs loaded onto the Galaxy Globemaster C17 of Indian Air Force. The aircraft is expected to reach Madhya Pradesh's Gwalior at around 10 am today.
— ANI (@ANI) February 17, 2023
(Video source: South African Department of Forestry, Fisheries and Environment's Twitter handle) pic.twitter.com/jGE4IoD3hi
12 चित्ते भारतासाठी रवाना
भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर वाहतूक विमानाद्वारे दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले जात आहेत. हे 12 चित्ते आज भारतात पोहोचतील. 12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे. भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 ते 11 या वेळेत भारतील हवाई दलाच्या विमानाने चित्ते ग्वाल्हेर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता चित्ते हेलिकॉप्टर कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचतील. चित्यांना आधी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाईल.
1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाला. भारतातून नामशेष झालेले चित्ते भारतात आणण्याची तयारी काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झाली होती. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. 1970 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली. नंतर हा प्रकल्प बारगळला.