
Anil Bonde : संजय राऊत यांनी बोलणे बंद केले नाही तर, शिवसेना संपेल; खासदार डॉ अनिल बोंडे यांचा खोचक टोला
मुख्यमंत्री आणि त्यांच्या विश्वासाचा माणुस जर अपक्ष आमदारांना घोडा म्हणणार असेल तर हा निश्चित गाढवपणा आहे, अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

नागपूरः शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दररोज सकाळी माध्यमांशी बोलतात. काहीही बोलतात आणि दिवसभर तेच वक्त्व्य टीव्हीवर सुरु असल्याने शिवसैनिकही वैतागले आहे. त्यामुळे शिवसैनिकही म्हणायला लागले की, संजय राऊत यांनी बोलणं थांबवावं. अन्यथा शिवसेनाच लंबी होईल, असा खोचक टोला भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लागावला.
नागपुरात माध्यमांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री आणि त्यांच्या विश्वासाचा माणूस जर अपक्ष आमदारांना घोडा म्हणणार असेल, तर हा निश्चित गाढवपणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे बोंडे म्हणाले, सत्ता ही लोकांच्या भल्यासाठीच असते, दुर्देवाने त्यांना सत्तेचा माज आला असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनता या राज्यसभा निवडणूकीच्या निकालाने खुश आहे. कारण महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदार हे सुद्धा महाविकास आघाडीच्या कार्यप्रणालीमुळे वैतागलेले आहे. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात, मुख्यमंत्री जनतेला भेटत नाही. तर जनतेचे काम कसे करणार. त्यामुळे शेतकरी शेतमजूर सगळे वैतागले आहे. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे जनतेला वाटत असल्याचेही ते म्हणाले.
'गाढवपणा संजय राऊतच करू शकतात'
शिवसेनेचे संजय राऊत यांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे, घोडेबाजारात आमदार विकले गेले असा आरोप केला, हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात, आणि तो त्यांनी केला आहे. कोणाचाही अपमान कोणीही करू नये, जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तो वर असे आरोप करू नये. मात्र, अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला आहे.
'राऊतांनी पंकजांबद्दल बोलू नये'
भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलू नये, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसाचा अपमान केला आहे. भाजप मध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळते. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्यांची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
