Hingoli News: मोठी बातमी: राज्यातील 'या' धरणाने गाठला तळ, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं, पिण्याचं पाणी मिळणंही होणार अवघड
Water shortage: राज्यात उन्हाचा कडाका वाढला, धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार ? या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आता प्रशासन काय करणार, हे पाहावे लागेल.
हिंगोली: सध्या उन्हाळा सुरू आहे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी राज्यामध्ये अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई पाहायला मिळतील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाने (Siddheshwar Dam) सुद्धा तळ गाठला आहे. धरणामध्ये आता केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. याशिवाय, हिंगोली, पूर्णा आणि वसमत शहराला पिण्यासाठी याच धरणातून पाणी सोडले जाते.
जिल्ह्यातील अनेक गावांच्या सामूहिक जलजीवन योजनेच्या पाण्याचे नियोजन सुद्धा याच धरणातील पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे आता शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्ण कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी चार आवर्तन सोडण्यात आले होते. पुढे एक महिना शिल्लक आहे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले पिके पाणी न सोडल्यास धोक्यात येऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणातून या सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसांत प्रशासनाची बैठक होणार आहे. सिद्धेश्वर धरणाने तळ गाठल्यानंतर धरणाची परिस्थिती काय आहे, याचा ड्रोनच्या साह्याने आढावा घेतला जात आहे. मात्र, तुर्तास धरणातील पाणीसाठा जवळपास संपल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता प्रशासन काय उपाय करणार, हे पाहावे लागेल.
मुंबईतही पाणीकपात होण्याची शक्यता
राज्यातील ग्रामीण भागांप्रमाणे शहरी भागांमध्येही पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती भीषण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा खालच्या पातळीला आला आहे. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना 15 ते 20 टक्के पाणीटंचाईचा सामोरे जावे लागू शकते. तसे झाल्यास मुंबईकरांसमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतील. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या या 7 तलावांमध्ये मिळून 16.97 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
हा पाणीसाठा फारतर दीड महिने पुरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे या तलावांमधील पाणी झपाट्याने आटत आहे. अशा परिस्थितीत तलावांमधील पाणी आणखी किती काळ पुरेल, हा प्रश्न आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची आशा आहे. तसे न घडल्यास मुंबईत पाणीकपात अटळ असल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा