एक्स्प्लोर

Beauty Tips: तुम्हीही अशा प्रकारे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराब

Skin Care: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढणे आवश्यक आहे. कधीकधी महिला घरीच हाताने दाबून ब्लॅकहेड्स काढतात. जोरात दाबल्यामुळे चेहऱ्यावर डाग येऊ शकतात, तर काहीवेळा त्वचा देखील सोलली जाऊ शकते.

Skin Care Tips: ब्लॅकहेड्स (Blackheads) चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये (Skin Pores) साचलेली ही घाण असते, जी काढताना सहजासहजी बाहेर पडत नाही. जास्त प्रदुषणामुळे देखील चेहऱ्यावर धूळ जमा होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात. ते चेहऱ्यावर काळ्या ठिपक्यांसारखे दिसतात. ब्लॅकहेड्स मुख्यत: नाकावर, हनुवटीच्या जवळ किंवा कधीकधी गालावर देखील तयार होतात.

ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. तथापि, ते काढताना काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण त्वचा खराब होऊ शकते. ब्लॅकहेड्स दूर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

नखांचा वापर करु नका

ब्लॅकहेड्स काढताना कधीही नखं (Nails) वापरू नका. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची मुळे (Roots) आत खोलवर असतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्यांना नखांनी काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा चेहऱ्यावर मुरुम (Pimples) येण्याचा धोका असतो. काहीवेळा नखांनी ब्लॅकहेड्स काढताना जखमा देखील होऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग (Dark Spots) पडतात.

ब्लॅकहेड्स काढणाऱ्या यंत्राचा योग्य वापर करा

ब्लॅकहेड रिमुव्हरने (Blackhead Remover) ब्लॅकहेड्स काढून टाकल्यानंतर काही लोक ते न धुता ठेवून देतात आणि नंतर ते तसेच पुन्हा वापरतात. असे केल्यास त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून जेव्हाही तुम्ही मेटल ब्लॅकहेड रिमुव्हर (Metal Blackhead Remover) वापरता तेव्हा ते पाण्याने धुवून कॉटन वाइपने (Cotton Wipe) पुसून स्वच्छ करुन ठेवा.

चेहरा खूप जोरात स्क्रब करू नका

ब्लॅकहेड्स काढताना मुली चेहरा जास्त स्क्रब (Scrub) करतात. चेहऱ्याच्या एकाच भागाला जास्त चोळल्याने तिथे पुरळ उठू शकतात. यामुळे त्वचा कोरडी (Dry Skin) देखील होऊ शकते आणि त्यामुळे जळजळही होऊ शकते. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचवतील असे स्क्रब वापरणे टाळा. हलक्या हातानेच फेस स्क्रब (Face Scrub) लावा, फेस स्क्रब जास्त वापरल्याने त्वचेला अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते.

तेलकट त्वचेतील ब्लॅकहेड्स कसे काढावे?

कोरड्या त्वचेच्या (Dry Skin) तुलनेत तेलकट त्वचेवरील (Oily Skin) ब्लॅकहेड्स काढणे खूप कठीण आहे. कारण चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाला घाण (Dirt) लवकर चिकटते आणि नंतर त्याचे ब्लॅकहेड्स बनतात. तेलकट त्वचेवरील ब्लॅकहेड्स काढण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. जर त्वचा कोरडी असेल तर प्रथम त्वचा मॉइश्चराइझ (Moisturise) करा आणि नंतर ब्लॅकहेड्स (Blackheads) काढून टाका.

सेफ्टी पिन किंवा रेझर वापरू नका

नाकावरील ब्लॅकहेड्स (Blackheads) काढण्यासाठी अनेक वेळा लोक सेफ्टी पिन (Safety Pin) किंवा रेझर (Razor) वापरतात. त्यामुळे त्वचा सोलण्याची भीती असते आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा अतिशय संवेदनशील (Sensitive) आणि मऊ (Soft) असते, त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी सेफ्टी पिन वापरल्यास त्वचा खराब होऊ शकते. घरी ब्लॅकहेड्स काढण्यात अडचण येत असेल तर ब्युटी पार्लरची (Beauty Parlour) मदत घ्या.

हेही वाचा:

Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
पाच वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, 23494 टक्के रिटर्न, 50 हजारांचे एक कोटी बनले
Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी
नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील 'या' भागांमध्ये संचारबंदी
Home Loan EMI Calculator: घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 18 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Relatives Police Station : नागपूर राड्यानंतर मुलांचा पत्ता नाही, नातेवाई पोलिस स्टेशनमध्येSpecial Report Aurangjeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकीय घमासान, राऊतांचं सरकारला आव्हानABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 March 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Multibagger Stock : 1 रुपयाचा 'हा' शेअर 400 पार गेला, पाच वर्षात 23494 टक्के परतावा, 50 हजारांचे बनले 1 कोटी रुपये
पाच वर्षात 'या' मल्टीबॅगर स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, 23494 टक्के रिटर्न, 50 हजारांचे एक कोटी बनले
Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी
नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील 'या' भागांमध्ये संचारबंदी
Home Loan EMI Calculator: घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
घर खरेदीसाठी 50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती EMI द्यावा लागेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याच्या दरात 11000 रुपयांची वाढ, अडीच महिन्यात चांदीनं उच्चांक गाठला, सोने-चांदीमधील गुंतवणूक वाढवावी का?
लग्नसराईमुळं खरेदीला जोर, सोन्याच्या दरात नववर्षात 11 हजारांची वाढ, चांदीच्या दरातही जोरदार तेजी
Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांना रस्त्यावर 'तो' महत्त्वाचा पुरावा सापडला, दंगलखोर बाईक सोडून पळाले
नागपूरमध्ये पोलिसांना रस्त्यावर 'तो' महत्त्वाचा पुरावा सापडला, दंगलखोर बाईकही सोडून पळाले
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
Embed widget