Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या
Summer Tips: सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे आणि सनस्क्रीन क्रीम वापरणे हा त्यावर एक प्रभावी मार्ग आहे.
Why Sunscreen Is Important: उन्हाळ्याचा ऋतू येताच तुमच्या कपड्यांची निवड बदलते, तसेच ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणेही आवश्यक असते. उन्हात राहिल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज होऊ शकते. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते, ज्यामुळे अकाली वृद्धत्व (Skin aging), सनबर्न (Sunburn) आणि अगदी त्वचेचा कर्करोग (Skin Cancer) देखील होऊ शकतो. सकाळी घरातून बाहेर पडताना त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून दिवसभर सुर्याची किरणं आणि धुळीपासून तुमची त्वचा सुरक्षित ठेवता येईल.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावर सनस्क्रीन (Sunscreen) क्रीम वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. आता हे ऐकून अनेकांना वाटेल की, सनस्क्रीनमध्ये असे काय आहे जे त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करते? जाणून घेऊया त्याबद्दलच सविस्तर...
सनस्क्रीन कसे ठरते उपयुक्त?
सनस्क्रीन लावल्याने त्वचेचा बाहेरील थर सुरक्षित राहतो आणि चेहऱ्यावर आरोग्यदायी चमक येते. सनस्क्रीन आपल्या त्वचेवर एका थरासारखे कार्य करते जे आपल्या त्वचेला तीव्र सूर्यप्रकाशाने होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. जसे की, झिंक ऑक्साईड, टायटॅनियम ऑक्साईड. हे आपल्या त्वचेचे वृद्धत्वाच्या प्रभावापासून म्हणजे अकाली वृद्धत्व आणि सूर्यप्रकाशापासूनही संरक्षण करते.
जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार मुरूम येत असतील आणि ते बरे झाल्यानंतर, त्यांचे डाग पडत असतील, तर या समस्येमध्ये सनस्क्रीन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, या समस्येला पोस्ट-एक्ने हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. चेहऱ्यावर नियमितपणे सनस्क्रीन लावत राहिल्यास मुरुमांच्या डागांपासून सुटका करणे सोपे होईल. त्यामुळे लहान असो की मोठे, स्त्री असो की पुरुष सर्वांनीच सनस्क्रीन क्रीमचा नियमित वापर केला पाहिजे.
कोणते सनस्क्रीन ठरते अधिक फायदेशीर?
सनस्क्रीनचा प्रभाव मुख्यतः त्यात असलेल्या SPS म्हणजेच सन प्रोटेक्टिंग फॅक्टरवर अवलंबून असतो. सनस्क्रीनमध्ये एसपीएफ (SPF) जितका जास्त असेल तितका सनस्क्रीन अधिक प्रभावी होईल.जर तुमच्या सनस्क्रीनमध्ये एसपीएफचे (SPF) प्रमाण 15 असेल तर त्वचेला सूर्यापासून 15 पट जास्त संरक्षण मिळते.
दुसरीकडे, जर तुम्ही सनस्क्रीन न वापरता कडक उन्हात बाहेर पडलात, तर त्वचा जळण्याचा धोका 15 पटीने वाढतो. तज्ज्ञांच्या मते, सूर्यापासून सुरक्षित राहण्यासाठी 30 आणि 50 SPF सनस्क्रीन सर्वोत्तम आहे.
सनस्क्रीन लागू करण्याचा योग्य मार्ग
सनस्क्रीनचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी, बाहेर जाण्यापूर्वी किमान 10 मिनिटे आधी ते लावा आणि दर दोन तासांनी ते पुन्हा लावा. सनस्क्रीन लावल्यावर त्यावर मॉइश्चरायझर वापरता येईल. जे मेकअप करतात त्यांनीही सनस्क्रीन वापरावे. डोळ्यांखाली सनस्क्रीन लावा आणि बाहेर जा, त्यामुळे डोळ्यांखाली आयबॅग येत नाहीत.
सनस्क्रीनचे फायदे
- सनबर्नपासून संरक्षण करते.
- टॅनिंगची समस्या उद्भवत नाही.
- त्वचा निरोगी राहते.
- त्वचेचा कर्करोग रोखला जातो.
- हायपरपिग्मेंटेशनपासून मुक्ती मिळते.
- मुरुमांच्या खुणा कमी होण्यास मदत होते.
- अकाली वृद्धत्व येत नाही.
हेही वाचा: