एक्स्प्लोर
बंदुकीचा धाक दाखवून ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडूला लुटलं!
रिओ द जनेरिओ: ऑलिम्पिकसाठी जगभरातून खेळाडू ब्राझीलमधील रिओ दि जनेरिओमध्ये दाखल होत आहेत. मात्र याचवेळी एक अशी घटना घडली आहे की, ज्यानं थेट खेळाडूंच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्पेनचा ऑलिम्पिक पदक विजेता सेलर फर्नांडो इकावारी आणि स्पेनच्या टीममधील दोन सहकाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवत लूटल्याची घटना रिओ द जनेरिओमध्ये घडली आहे. नाश्ताला जात असतानाच दरोडोखोरांनी बंदूकीचा धाक दाखवून त्यांना लुटलं.
इकवारीनं दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही थोडं साहसी होतो आणि भाग्यशालीही त्यामुळेच या घटनेतून बचावलो. त्यावेळी आमच्याकडे भरपूर आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास ऑलिम्पिकसाठी महत्वाचा असतो.' असं इकवारी म्हणाला.
इकवारी आणि स्पेनच्या सेलिंग टीमच्या दोन सदस्यांना शुक्रवारी सकाळी दरोडेखोरांनी लुटलं. पाच तरुण दरोडेखोरांनी या तिघांवर थेट बंदूक रोखलं. या पाचही जणांचं वय 16 वर्षापेक्षा अधिक नव्हतं. अशी इकवारीनं माहिती दिली.
'आम्ही कोणताही विरोध न करता आमच्याकडील मोबाइल आणि छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्यांच्या हवाली केले. ते घेऊन त्यांनी तिथून पळ काढला.' असं इकवारीनं सांगितलं.
ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना खेळाडूंच्या सुरक्षतेबाबत झालेली ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे यापुढे ब्राझील सरकारसमोरील आव्हान आणखी वाढलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement