एक्स्प्लोर

Gondia Accident : गोंदियात बोलेरोची दुचाकीला मागून धडक, 5 महिन्यांच्या बाळासह तीन जणांचा दुर्दैवी अंत

Gondia Accident : गोंदियात बुलेरोची दुचाकीला मागून धडक, 5 महिन्यांच्या बाळासह तीन जणांचा दुर्दैवी अंत

Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर एका चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये मोरगाव अर्जुनी तालुक्यातील येरंडी / देवलगांव येथील 25 वर्षीय महिलेसह तिचा 5 महिन्याचा बाळ व घराशेजारी राहणारी 3 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. 

अधिकची माहिती अशी की, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगांव येथील संदिप राजु पंधरे (वय 29) हा युवक आपल्या मोटार सायकलने पत्नी चितेश्वरी पंधरे, मुलगा संचित पंधरे व घराशेजारी राहणारी पार्थवी सिडाम (3) यांचेसह दुचाकीने गावावरून नवेगावबांध येथे जात होता. दरम्यान बाराभाटी - नवेगावबांध मार्गावर मागून भरधाव येणा-या चारचाकी बुलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चितेश्वरी संदिप पंधरे, 5 महिन्याच्या चिमुकला संचित पंधरे व घराशेजारील पार्थवी सिडाम हे तिघेही जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक संदिप राजू पंधरे हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहीती प्राप्त होताच नवेगावबांध पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले असून मृतकांना व जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमी संदिप पंधरे याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी घेतली आहे...

कार आणि रिक्षाच्या अपघातात दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी 

कार आणि ऑटोच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाल्याची घटना वरोरा तालुक्यातील येन्सा येथे घडली आहे. रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिक्षुकांच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले, जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहात असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Anjali Damania : देशमुखांचं पोस्टमॉर्टम केलं, अंबाजोगाईत पियुष हॉटेल, वाल्मिकसाठी नाशिकहून बीडला आणलं? अंजली दमानियांनी सिव्हिल सर्जनची कुंडली मांडली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
Devendra Fadnavis in Delhi: देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
Devendra Fadnavis in Delhi: देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
Amol Mitkari and Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'
Maharashtra live blog updates: मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
Embed widget