Gondia News : प्रजासत्ताक दिनी लग्नमंडपात पोहोचण्याआधी दोन भावंडांकडून ध्वजारोहण
Gondia News : गोंदियाच्या चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपात जाण्याआधी ध्वजारोहण केलं. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या दोन्ही भावंडांनी ध्वजारोहण करत देशाच्या संविधानाला बळकट करण्याचा सामाजिक संदेश दिला आहे.
Gondia News : लग्नमंडपात जाण्याआधी वर आणि वधूला मतदान करुन जाताना आपन नेहमीच पाहतो. मात्र, गोंदियाच्या (Godia) चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपात जाण्याआधी ध्वजारोहण (Flag Hoisting) केलं. आज प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2023) औचित्य साधून या दोन्ही भावंडांनी ध्वजारोहण करत देशाच्या संविधानाला (Constitution) बळकट करण्याचा सामाजिक संदेश दिला आहे.
यंदा देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. त्यामुळे या दिनाची सर्वांना आठवण राहावी यासाठी राम आणि श्याम या दोन भावंड लग्न मडंपात जाण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. तर, चांडक कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगीत म्हणत तिरंग्याला मानवंदना देत सामाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे.
राम आणि श्याम चांडक हे दोघेही उद्योगपती आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील राहणारे आहेत. दोघेही दोघे उच्चविद्याविभूषित आहेत. या दोघांचा विवाह आज सकाळी गोंदिया इथे पार पडला.
बोहल्यावर चढण्याआधी ध्वजारोहण करण्याची संकल्पना काकांची : राम चांडक
लग्नाची तारीख 25, 26 ठरली तर घोडीवर बसण्यापूर्वी आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे अशी संकल्पना माझ्या काकांची होती. हे आपल्या देशाच्या प्रती कार्य आहे आणि ते करायचं आहे. मला असं वाटतं की लग्नापूर्वी ध्वजारोहण करण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल, असं वर राम चांडक सांगितलं.
माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण : राजेश चांडक
माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. याच दिवशी संविधान अंमलात आलं आहे. प्राध्यापक असल्यामुळे शाळा, कॉलेजमध्ये जाऊन ध्वजारोहण करावं लागतं. आज दुग्धशर्करा योग आहे. आज माझं संपूर्ण कुटुंब इथे आहे आणि माझ्या मुलांच्या निमित्ताने त्यांच्यासोबत मला ध्वजारोहणाचा आनंद लुटता आला आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया राम आणि श्याम यांचे काका राजेश चांडक यांनी दिली.