एक्स्प्लोर

शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 

Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचार्‍याचा देखील समावेश आहे.

Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या शिवशाही बस अपघाताने राज्यासह देशात एकच खळबळ उडवली आहे. गेल्या 15 वर्षात हा सर्वात मोठा बस अपघात असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 लोक गंभीर आणि 26 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहे. हा अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला? याचा तपास सुरू झाला आहे. मात्र या घटनेने अनेकांचे घर उद्ध्वस्त केली आहेत. तर अनेकांचे दैव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले आहे. 

दरम्यान भंडारा तालुक्यातील दोन दाम्पत्यांचा गोंदियाचा शिवशाहीचा प्रवास शेवटचा ठरला आहे.  त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे.  राजेश देवराम लांजेवार आणि मंगला राजेश लांजेवार (रा. पिपरी) तसेच रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे (रा. चांदोरी) अशी त्यांची नावे आहेत. साकोली तालुक्यातील चांदोरी येथील मूळ रहिवासी असलेले रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे यांची विवाहित मुलगी गोंदिया येथे राहत असून ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी कनोजे दाम्पत्याने साकोली येथून शिवशाही पकडली होती. याचदरम्यान त्यांच्यावर काळाने झडप घातली अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 

तर या अपघातात दुसरे दाम्पत्य भंडारा तालुक्यातील पिपरी येथील आहे. राजेश देवराम लांजेवार (वय ३८) व मंगला राजेश लांजेवार (३०) यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षीय मुलगा रियांशू प्रवास करत होता. अपघातात राजेश व मंगला यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकला रियांशू जखमी झाला. त्याच्यावर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

लग्नकार्यासाठी गेलेले कुटुंब झाले बस अपघातात उद्ध्वस्त

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले पालकत्व गमावले आहे. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सय्यद कुटुंब हे एका लग्नाकार्यासाठी साकोली येथे गेले होते. लग्न कार्य उरकून ते साकोली वरून शिवशाही बसचा प्रवास करीत आपल्या गोरेगाव घोटी या गावाकडे येण्यासाठी निघाले. पण या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला अजगर अली सय्यद आणि आरेफा अजगर अली सय्यद या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच अपघातात मृतक अजगर अली यांचा एकुलता एक मुलगा व आई जखमी झाले आहेत. तर अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा अत्तर अली अली हा पोरका झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी आज सय्यद कुटुंबीयांना भेट देत त्यांचे सांत्वन केले.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget