Gadchiroli Rain : गडचिरोलीत पुन्हा दमदार पाऊस, पर्लकोटा नदीला पूर, आलापल्ली भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. भामरागड (Bhamragarh) शहरालगत असलेल्या पर्लकोटा नदीला परत एकदा पूर आला आहे.
Gadchiroli Rain : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. भामरागड (Bhamragarh) शहरालगत असलेल्या पर्लकोटा नदीला परत एकदा पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड शहरात शिरलं आहे. भामरागडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. अचानक पुराच्या पण्याची पातळी वाढल्यामुळे लोकांची पळापळ सुरु झाला आहे. आलापल्ली भामरागड मार्ग परत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 120 गावांचा संपर्क परत मुख्यालयाशी तुटला आहे. दोन दिवसाआधी हा मार्ग सुरु झाला होता. आता परत तो बंद झाला आहे.
दरम्यान, मागच्या दोन दिवसात गडचिरोलीत पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला होता. हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत होती. पुराचं पाणी देखल कमी होत होतं. मात्र, आज पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. भामरागडमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. आलापल्ली भामरागड मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. मागच्या दोन दिवसाखालीच पर्लकोटा नदीलचा पूर ओसरला होता. मात्र, आता पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागच्या तीन दिवसाखाली अनेक नागरिकांची घरं पाण्याखाली गेली होती. मात्र, पुन्हा मुसळधार पाऊस सुरु असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे.
दक्षिण गडचिरोलीतसुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सिमेवरील शेवटचं टोक म्हणजे सिरोंचा तालुका. तिथे देखील गेल्या पाच ते सहा दिवसापासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. कालपासून या ठिकाणची पूरस्थिती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, भामरागडची स्थिती गंभीर होत चालली आहे. दरम्यान, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भारमरागडमध्ये स्तीरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नर्सचं पथक दाखल झालं आहे. येथील गरोदर मातांसाठी या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवल्या जाार आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे पथक भामरागडमध्ये दाखल झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Gadchiroli Flood : गेल्या चार दिवसांपासून गडचिरोलीतल्या सिरोंचा शहराला पाण्याचा वेढा, 40 गावातील नागरिकांचं स्थलांतर
- Gadchiroli : भामरागडमध्ये सिझेरियन पथक दाखल, गरोदर मातांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद पाऊल