एक्स्प्लोर

Gadchiroli : भामरागडमध्ये सिझेरियन पथक दाखल, गरोदर मातांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद पाऊल

Gadchiroli Latest News : दर सात दिवसांनी हे पथक बदलणार असून दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडविली आहे.

Gadchiroli Latest News : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त असलेला तालुका म्हणून ओळखला जाणारा भामरागड तालुका दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटावरील पूल व इतर नाले भरून वाहतात. परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो. अशावेळी गरोदर मातांच्या प्रसुती दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी नेहता येत नाही. त्यामुळे अनेक मातांना आपला जीव गमवावा लागतो.  तर अनेक माता आपला जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रूग्णालयापर्यंत पोहचत असल्याचे अनेक उधारण आपण एबीपी माझ्याच्या माध्यमातून प्रेकषकांनी बघितले होते. यामुळे इतिहासात पहिलांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता विशेष आरोग्य पथक भामरागडला रवाना झाले आहे.

सध्या भामरागड ग्रामीण रूग्णालयात गरोदर मातांसाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पावसाआधीच 19 गरोदर मातांना ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी ५० गरोदर माता राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जवळच असलेल्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहेरघरात असणाऱ्या गरोदर माताही गरजेनूसार भामरागड येथे दाखल होणार आहेत. प्रसुती दरम्यान मातेला काही अडचणी निर्माण झाल्यास शस्त्रक्रियेची गरज असते. अशावेळी भामरागड येथे ऑपरेशन व्यवस्था नाही. शासकीय सुविधा या अहेरी येथे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी यांनी गरोदर मातांना अहेरी किंवा गडचिरोली येथे आणण्यापेक्षा आपलाच चमू भामरागडला नेहता येईल का? याबाबत आरोग्य विभागशी चर्चा करून एक चमू पाठविण्याच्या सूचना केल्या. आता दर सात दिवसांनी हे पथक बदलणार असून दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडविली आहे. दुर्गम भागात पावसाळयात दरवर्षीच माहेर घर किंवा शासकीय दवाखान्यातील निवारा गृहात गरोदर मातांना ठेवले जाते. प्रसुतीवेळी मातांना आवश्यक आरोग्य सेवा देणे, त्यांना योग्य आहार देणे अशा सोयीसुविधा प्रशासनाकडून दिल्या जातात. परंतू यावेळी खुद्द भामरागड मधेच गरज भासल्यास अगदी सीझर सुद्धा केले जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!
ट्रेविस हेड-अभिषेक शर्मानं रचला इतिहास, दिल्लीच्या बॉलर्सचा पॉवरप्लेमध्ये पालापाचोळा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Unseasoanl Rian : रिमझीम पावसामुळे  पुणेकरांना दिलासा, दुपारपासून पुण्यात रिमझीम पावसाच्या सरीChhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha ठरलं! छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारीSharad Pawar : पहाटेच्या शपथविधीचा अजित पवारांचा दावा शरद पवारांनी फेटाळला, म्हणाले...TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!
ट्रेविस हेड-अभिषेक शर्मानं रचला इतिहास, दिल्लीच्या बॉलर्सचा पॉवरप्लेमध्ये पालापाचोळा
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Embed widget