एक्स्प्लोर

गडचिरोलीमध्ये पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक, दोन जहाल नक्षलवादी ठार, एक जण अटकेत 

Gadchiroli: महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सिमेपासून 10  किलोमीटर अंतरावर आत असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक झाली.

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विभागाअंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे दामरंचा पासून महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सिमेपासून 10  किलोमीटर अंतरावर आत असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक झाली. यात 2 नक्षली टिपण्यात सुरक्षा दलांना यश आले तर 1 जखमी नक्षलीला अटक करण्यात आली.  गोपनिय माहीतीवरुन गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) 300 जवान व डीआरजी पोलीस पथक छत्तीसगडचे २० जवान हे संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित होते. जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालू होती. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर १ महिला नक्षल व १ पुरुष नक्षल मृत अवस्थेत आढळले. मृत महिला नक्षलीची ओळख 

कांती लींगच्या ऊर्फ अनिता,  41 वर्षे, रा. लक्ष्मीसागर, पोस्टे कडेम, जि. निर्मल राज्य तेलंगना अशी झाली आहे. ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरीया कमेटी) या पदावर कार्यरत होती. तीच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच तेलंगना शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मृत महिला नक्षल ही मैलारापु अडेल्लु ऊर्फ भास्कर (तेलंगना राज्य समीती सदस्य व सचीव कुमारम भिम डिव्हीजन कमीटी) यांची पत्नी होती. या चकमकीत एक अनोळखी पुरुष नक्षल मृतदेह व जखमी अवस्थेत असलेले एक नक्षल मिळाले. जखमी नक्षलीचे नाव लचमया कृच्चा बेलादी चय 28 वर्षे, रा. टेकामेटा, छत्तीसगड असून तो सध्या जनमिलीशिया सदस्य म्हणून नक्षलवाद्याकरीता काम करत होता.

घटनास्थळावरुन 02 एसएलआर रायफल, 01 भरमार रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान व डीआरजी पोलीस पथक यांचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दल व बीजापूर पोलीस यांनी पहील्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले असून पुढील गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असून पुढील तपास बीजापूर पोलीस यांचेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

ही बातमी वाचाच:

Mumbai IIT: आयआयटीची पोरं हुशार! मुंबई आयआयटीत भरघोस पॅकेज; एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार, 25 विद्यार्थ्यांना एक कोटी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते  12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Suspended : अंबादास दानवे निलंबित, विरोधी पक्षाचा सभागृहात गोंधळWariche Rang Shivlila Sobat :  वारीचा रंग, टाळ मृदुंगाचा नाद; शिवलीलाने घेतली फुगडीची गिरकीWariche Rang Shivlila Sobat : वारीतील वारकरी जेवण कसं बनवतात ?ABP Majha Headlines :  2:00PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Telly Masala : 'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते  12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'मुंज्या'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री ते 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Disha Patani : 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय दिशा? टॅटूमुळे चर्चांना उधाण
Electricity Bill: पडकं घर, दोन पंखे आणि एक कुलर; पण लाईट बिल मात्र 24 लाखांचं; पाहून डोळेच भिरभिरले, काय घडलं नेमकं?
पडकं घर, दोन पंखे आणि एक कुलर; पण लाईट बिल मात्र 24 लाखांचं; पाहून डोळेच भिरभिरले
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
Embed widget