एक्स्प्लोर
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक घटली, अजूनही दूध संकलन नाहीच

अहमदनगर: महाराष्ट्र बंदचा परिणाम नगर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. भाजीपाला आणि दूध संकलनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाल्याची केवळ एक टक्के आवक झाली आहे तर दुधाचं शून्य संकलन झालं आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यातील मार्केट यार्डला भाजीपाल्याची आवक घटलेलीच आहे. जिल्ह्यातील मार्केटला केवळ 1 टक्का आवक झाली आहे. फळांची 104 क्विंटल आवक तर भाजीपाल्याची 950 क्विंटल आवक झाली आहे. केवळ तीनच मार्केटला संगमनेर, शेवगाव आणि नगरला आवक झाली आहे, तर श्रीरामपूर, कोपरगाव बंद आहे. नगर मार्केटला कालच्या तुलनेत आवक वाढली मात्र सरासरीच्या केवळ 50 टक्के आवक झाली आहे. भाजीपाल्याची सरासरीच्या 500 क्विंटल तर फळांची 104 क्विंटल आवक झाली आहे. सरासरीच्या 50 टक्के भाजीपाला आवक तर फळांची सरासरी 15 टक्के आवक आहे. भाज्यांचे दर
- कोबी २५ रुपये किलो
- टोमॅटो ३० रुपये किलो
- फ्लॉवर ३० रुपये किलो
- कोबी २५ रुपये
- गवार ५० रुपये
- कारले २५ रुपये
- भेंडी २५ रुपये
- हिरवी मिरची ४२ रुपये
- मोथी १४ रुपये गड्डी
- कोथिंबीर १० रुपये गड्डी
आणखी वाचा























