Social Media Down: फेसबुक-इंस्टाग्राम आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन; कंपनीने मागितली माफी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सर्वर एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले. सर्व्हर डाऊन झाल्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम हे अॅप्स काही वेळेसाठी बंद झाले होते.
दिल्ली: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सर्वर एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाले. सर्व्हर डाऊन झाल्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम हे अॅप्स काही वेळेसाठी बंद झाले होते. त्यामुळे यूजर्स निराश झाले. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा सुरू झाले आहे. या आधी रविवार आणि सोमवारी (3 ते 4 ऑक्टोबर दरम्यान) इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्स-अॅपचे सर्व्हर सहा तास डाऊन होते.
फेसबुक कंपनीचे ट्विट
फेसबुकच्या कंपनीने ट्विट करत सांगितले की, 'आम्हाला माहित आहे की लोकांना आमचे अॅप्स आणि वेबसाइट वापरताना अडथळा येत आहे. आम्ही या गोष्टीवर काम करत आहोत. आम्ही सर्व गोष्टी पुन्हा व्यवस्थित करण्यावर काम करत आहोत. झालेल्या गैरसोईबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो.' फेसबुकने अणखी एक ट्विट करत सांगितले, 'आम्हाला माहित आहे की लोकांसोबत संपर्क साधण्यासाठी तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात. आम्ही ही समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. या आठवड्यात तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आम्ही आभार मानतो. '
We’re aware that some people are having trouble accessing our apps and products. We’re working to get things back to normal as quickly as possible and we apologize for any inconvenience.
— Facebook (@Facebook) October 8, 2021
इंस्टाग्राम कंपनीचे ट्विट
'आम्हाला माहित आहे की, आत्ता अनेकांना इंस्टाग्राम अॅप वापरताना अडथळा येत आहे. आम्ही या गोष्टीबद्दल माफी मागतो. ', असं ट्विट इंस्टाग्रामने केले आहे.
We know some of you may be having some issues using Instagram right now (🥲). We’re so sorry and are working as quickly as possible to fix.
— Instagram Comms (@InstagramComms) October 8, 2021
Whatsapp Down: व्हाट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने नेटकरी हैराण
आठवड्यातुन दुसऱ्यांदा फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन
आठवड्यातुन दुसऱ्यांदा फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन झाले आहे. या आधी सोमवारी(4 ऑक्टोबर) रोजी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर फेसबुकच्या वेबसाईटवर यूजर्ससाठी एक मेसेज लिहिला होता. "काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू. असुविधेसाठी क्षमस्व."