एक्स्प्लोर

Tean India Semifinal Scenarios : टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म?, द. आफ्रिकेच्या विजयासाठी भारतीय चाहत्यांचा नवस; असं समीकरण जे ऐकून बसेल धक्का

WI vs SA Match Result How Can India Qualify For Semi Final : टीम इंडियाच्या सेमीफायनलची किल्ली सध्या दक्षिण आफ्रिकाच्या हातात आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात महत्त्वाचा सामना रंगला आहे.

How Can India Qualify For Semi Final : टीम इंडियाच्या सेमीफायनलची किल्ली सध्या दक्षिण आफ्रिकाच्या हातात आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात महत्त्वाचा सामना रंगला आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पण हा सामना फक्त दोन संघांपुरता मर्यादित नाही, तो भारताच्या सेमीफायनलच्या आशांशी थेट जोडलेला आहे.

दक्षिण आफ्रिका जिंकली तर भारताला कसा फायदा?

भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित मोठ्या प्रमाणात आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. जर आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, तर त्यांचे 4 गुण होतील आणि ते थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

त्याचवेळी भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला, तर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचे 2-2 गुण होतील. झिम्बाब्वे सलग दोन सामने गमावल्यामुळे स्पर्धेबाहेर जाईल. 

अशा परिस्थितीत सेमीफायनलच्या दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला होणारा सामना ‘करो या मरो’ ठरेल. जो संघ जिंकेल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

भारताच्या सेमीफायनलचं अचूक समीकरण

भारताला पुढील तीन गोष्टी घडणे आवश्यक आहे. आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करणे आणि भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवणे, तर 1 मार्चला भारताने वेस्ट इंडिजला हरवणे.

यामुळेच आज संपूर्ण भारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. यावेळी वेस्ट इंडिजने पहिल्या 9 षटकांतच 6 महत्त्वाचे विकेट गमावले, आणि फर्त 72 धावा केल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेची पकड सामन्यावर मजबूत दिसत आहे.

नेट रनरेटची चिंता संपेल!

आज वेस्ट इंडिज पराभूत झाली आणि भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवला, तर टीम इंडियाला नेट रनरेटचा विचार करण्याची गरज उरणार नाही. मग 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त विजय मिळवणे हेच एकमेव लक्ष्य असेल. 

हे ही वाचा -

Ind Vs Zim T20 World Cup 2026 : टीम इंडियाची पहिली फळी सपशेल फेल, खराब कामगिरीचा धक्कादायक आकडा, झिम्बाब्वेपेक्षाही भयंकर अवस्था

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
Vaibhav Sooryavanshi : 6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
SL vs IND 1st Test : 4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Vaibhav Sooryavanshi News : भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Embed widget