(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : जात वैधता प्रमाणपत्राकरीता अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
ज्या अभ्यासक्रमाला सीईटी अंतर्गत प्रवेश आहेत व वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असलेले अर्जधारक 30 जुलै पर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. पात्र उमेदवारांना 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत अर्ज सादर करता येईल.
नागपूर : चालूवर्षात बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकत असलेल्या पुढे ज्यांना आरक्षणांतर्गत प्रवेश घ्यावयाचा असलेल्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राकरीता अर्ज सादर करण्यास 31 डिसेंबर 2022 मुदतवाढ देण्यात आली आहे. जे विद्यार्थी चालु शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान शाखेत आहेत, त्यांनी त्यांचे अर्ज 1 जुलै 2022 नंतर सादर करावे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र पवार यांनी कळविले आहे.
शासनस्तरावर अनेक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वीच वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभासक्रमास प्रवेशापासून वंचित राहू नये यास्तव ज्या मागासवर्गीय बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सीईटी परीक्षेच्या पुराव्यासह तत्काळ अर्ज सादर करावा.
चालू वर्षात बारावी विज्ञान विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 1 जुलै ते 30 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. एम.बी.ए, एल.एल.बी, बी.ई. द्वितीय वर्ष, औषधनिर्माण शास्त्र पदविका, बि.एड, एम.एड इत्यादी व्यावसायिकअभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमाला सीईटी अंतर्गत प्रवेश आहेत व वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असलेले अर्जधारक 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. पात्र उमेदवारांना सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत अर्ज सादर करता येईल. विद्यार्थी, पालक व संस्थांनी उपरोक्त प्रमाणे नोंद घेवून मुदतीत कार्यवाही करावी, असे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांनी कळविले आहे.
पात्रता निकष
अनुसूचित जातीचे अर्जधारक असल्यास अर्जदाराचे वाडवडीलांचे 1950 पूर्वीचे नागपूर जिल्ह्यातील वास्तव्य पाहिजे, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील अर्जधारक असल्यास त्यांचे वाडवडीलांचे 1961 पुर्वीपासूनचे वास्तव्य जिल्ह्यातील आवश्यक आहे. इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्जदाराचे वाडवडीलांचे वास्तव्य 1967 पुर्वीपासूनचे जिल्ह्यातील असणे आवश्यक आहेत. उपरोक्त मानीव दिनांकापूर्वीचे अर्जधारक नसल्यास त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात अथवा राज्यात जातीचे प्रमाणपत्र काढावे व संबंधित व्यवस्थेकडून तपासून घ्यावे.
अर्जधारकांनी प्राप्त वैधता प्रमाणपत्र sign not valid नमूद असल्यास प्रमाणपत्र adobe acrobat ॲपमध्ये डाऊनलोड करावा व सेव्ह ॲज करुन प्रिंट काढावी असे केल्यास सही वैध राहील, असेही कळविण्यात आले आहे.