धक्कादायक! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केलं; दारात अंत्यविधीची तयारी सुरू असताना लक्ष्यात आला प्रकार, उल्हासनगरमध्ये खळबळ
Ulhasnagar News: उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिमान तायडे (वय 65) या जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून डॉक्टरांनी चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून ठिक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने रिक्षाने उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉ.आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयातून थेट डेथ सर्टिफिकेट देण्यात आले आणि नातेवाईकांनी अभिमान यांना घरी नेले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, नातेवाईकांच्या लक्षात आले की अभिमान यांच्या छातीची धडधड सुरू आहे. तेव्हा तातडीने त्यांना उल्हासनगरमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले. त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालय व डॉ. आहुजा यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
रुग्णाची नस मिळाली नाही, आजूबाजूला गोंगाटामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत
या प्रकरणात डॉ. आहुजा यांनी चूक झाल्याचे मान्य केले असून, "रुग्णाची नस मिळाली नाही, तसेच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. "चुकीने मृत घोषित केले, याबद्दल खेद व्यक्त केला आहे." तर मला कावीळ झाली होती माझी तब्येत बरी आहे आता जेवण केले आहे. अशी प्रतिक्रिया रुग्ण अभिमान तायडे यांनी दिली आहे.मात्र, या प्रकारामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर विरोधात नेमकी काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबरनाथ बारकूपाडा परिसरात जोरदार राडा
अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट आपापसात भिडल्याचे घटना घडली. गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकानी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले. त्यानंतर संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी तरुणाला चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली . या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























