एक्स्प्लोर
मुंबई कोस्टल रोड भुयारी मार्गात गाडी पलटली, पोलिसांकडून जखमींची सुटका, चालकाच्या एका गोष्टीमुळं प्रवासी बचावले
Mumbai Costal Road : मुंबई कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर एक कार पलटी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच मदतकार्य केल्यानं जखमींची सुखरुप सुटका झाली.
मुंबई कोस्टल रोड अपघात
1/5

शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता कोस्टल रोड भुयारी मार्ग येथे पाऊस असल्यामुळे गाडी स्किड होऊन पलटली.
2/5

गाडीच्या दोन्ही एअर बॅग ओपन झाल्या होत्या आणि चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे जास्त इजा झाली नाही. रस्त्याच्या मधोमध गाडी पलटल्यामुळे ट्राफिक कंजेशन झाले होते.
3/5

यावेळी मुंबई सेंट्रल आरटीओ ऑफिस चे टॅक्सी स्कॉड चे पथक या गाडीच्या थोड्या पाठीमागे होते. कोस्टल रोड मधील इमर्जन्सी लँडलाईन फोन वापरून पथकाने कंट्रोल रूमला ॲम्बुलन्स व टोइंग व्हॅन पाठवण्यास कळविले.
4/5

तसेच यावेळी भुयारी मार्गात पॅनिक होऊ न देता व अपघातातील गाडीभोवती ट्राफिक जमा न होऊ देता तेथील ट्रॅफिक सुरळीत केली. टोइंग व्हॅन आल्यावर सदर गाडी पलटली असल्यामुळे दुसऱ्या वाहन चालकांची मदत घेऊन सदर वाहन सरळ करून टोइंग करण्याची मदत केली.
5/5

भुयारी मार्गात जमलेल्या ट्राफिकला सुरळीत करून तिथे पॅनिक होऊ दिले नाही. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जास्त इजा झालेली नव्हती, हे सोनवणे म्हणून फूड इन्स्पेक्टर होते. त्यांनी आपल्या पथकाच्या सहकार्याबद्दल आम्हाला धन्यवाद केले. सदर प्रसंगी आरटीओ मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी मदत पथकातील समोवानि श्री अमोल पवार, चालक श्री निलेश शेटे आणि संतोष शिंपी यांनी मदत केली.
Published at : 14 Jun 2025 12:04 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
पुणे
छत्रपती संभाजी नगर


















