एक्स्प्लोर

Vijaykumar Gavit : मासे खाल्ल्यानं स्त्रियांचे सौंदर्य खुलते, विजयकुमार गावितांचा जावईशोध

ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.

 धुळे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (VijayKumar Gavit) आपल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आलेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मासे खाल्ल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलते तसेच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावईशोध विजयकुमार गावित यांनी लावला आहे. धुळ्यातील (Dhule News) आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात. यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी मासे खाल्ल्यानंतर  डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावईशोध लावला आहे. हे बोलत असताना अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.

आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित म्हणाले, “मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर स्त्रिया सुंदर दिसतात. त्याचबरोबर नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे.ती बंगळूरुची आहे. ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचं ऑईल असतं. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते.”

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला आदिवासी मंत्री विजय कुमार गावित देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजयकुमार गावित यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

(विजयकुमार गावितांचे वक्तव्य आम्ही शब्दश: वापरु शकत नाही... विजयकुमार गावितांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ आम्ही या बातमीसह जोडत आहे.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget