Dhule Grampanchayat Result : धुळ्यात भाजपचं निर्विवाद यश, 33 पैकी 32 ग्रामपंचायतींवर कमळ, पहा एका जागा कोणाला?
Dhule Grampanchayat Result : धुळे (Dhule) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे (Grampanchayat Election) निकाल हाती आले असून 33 पैकी 32 जागांवर भाजपने (BJP) कमळ फुलविले आहे.
Dhule Grampanchayat Result : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Result) बिगुल वाजला असून इकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात भाजपने (BJP) निर्विवाद यश संपादित केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे (Grampanchayat Election) निकाल हाती आले असून 33 पैकी 32 जागांवर भाजपने कमळ फुलविले आहे. तर फक्त राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकीसाठी (election) मतदान रविवारी पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (Gram Panchayat Election Results 2022) होत असून अनेक भागातील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यातील तब्बल 32 जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाने मोहोर उमटवली आहे. तर शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला असल्याचे चित्र आहे.
दरम्यान धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी काल रविवार निवडणूक प्रक्रिया पार पडली. रिमझिम पावसात नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळपासुन मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरवात झाली. त्यानंतर हळूहळू कल येण्यास सुरवात झाली होती. यामध्ये भाजपने सुरवातीपासून आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर शेवटपर्यंत भाजपने सर्वच जागा जिंकून केवळ जागेवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. तर इतर पक्षांना काढता पाय घ्यावा लागला आहे.
असा आहे धुळे जिल्ह्यातील निकाल
दरम्यान धुळे जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती 33 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. काल रविवारी धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासुन मतमोजणीचा सुरवात झाली. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक निकालाचा काल हाती आला. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना, शिंदेसेना, काँग्रेस या पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.
राज्यात मतमोजणी शेवटच्या टप्प्यावर
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (19 सप्टेंबर) पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंच अशा दोन्हीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडते आहे. सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली असून अनेक जिल्ह्यातील निकाल लागले आहेत.