Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण
राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झालं. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत.

Background
Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election Results 2022) काल, रविवारी मतदान झालं. आज या शेकडो गावांचे गाव कारभारी त्या त्या गावाला मिळणार आहेत. राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे काल प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33.
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02.
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01.
वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08.
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04.
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17.
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 01.
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08.
कोल्हापूर: कागल- 01.
इतर महत्वाच्या बातम्या
Gramanchayat Election : राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान, सोमवारी निकाल
Nashik Grampanchayat Election Update : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण
Nashik Grampanchayat Election Update : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Grampanchayat Update : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य संघटनेने उघडले विजयाचे खाते, गणेशगाव ग्रामपंचायतीत रुपाली ठमके विजयी
Grampanchayat Update : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेने ग्रामपंचायतीमध्ये खात उघडले असून गणेशगाव ग्रामपंचायतीत रुपाली ठमके सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. स्वराज्य संघटनेच्या प्रभावाखाली असलेली ग्रामपंचायत म्हणून गणेशगावची ओळख आहे.

























