एक्स्प्लोर

Girish Mahajan : अजित पवार नाराज असल्याची चर्चा, गिरीश महाजन म्हणाले...

धुळे : "अजितदादा नाराज नाहीत, आम्ही सगळे एक आहोत. एकनाथ खडसेंनी त्यांचं बघावं आणि लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी," असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

धुळे (Dhule) : "अजितदादा नाराज नाहीत, आम्ही सगळे एक आहोत. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) त्यांचं बघावं आणि लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी," असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे. अर्थ खात्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अर्थ खाते हातात असल्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. परंतु हे पुढे टिकेल की नाही हे माहित नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. 

मंत्री गिरीश महाजन हे रविवारी (24 सप्टेंबर) धुळ्यात गणपतीची आरास बघण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "अजितदादा नाराज वगैरे काही नाहीत. आम्ही सगळे एक आहोत. एकनाथ खडसेंनी त्यांचं बघावं, तुमचं पुढचं भविष्य काय आहे ते बघावं तसेच एकनाथ खडसे यांनी लोकसभेला उभे राहून दाखवावे, कशाला उगाच हा नाराज, तो नाराज करत आहात. दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे."  तसंच जळगावात असताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, "एकनाथ खडसेंनी शरद पवारांना घट्ट धरुन रहावे. भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंनी जास्त हातपाय जोडू नये. राष्ट्रवादीमध्ये राहिलेले देखील आमच्याकडे यायला लागले आहेत. मला माहित आहे खडसे अजित पवारांसोबत येण्यासाठी काय काय करत आहेत. याची कल्पना सर्वांना आहे. अगदी अजित पवारांनासुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न थांबवावेत."

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी शनिवारी (23 सप्टेंबर)  बारामतीत अर्थमंत्रीपदावरून मोठे वक्तव्य केले होते. "आज माझ्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढे अर्थ खाते टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही," असं अजित पवार यांनी म्हणाले होते. या वक्तव्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "अजित पवार महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी." यानंतर गिरीश महाजन यांनी अजित पवार नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

आता मुख्यमंत्री व मंत्र्यांचा प्रोटोकॉल अंबादास दानवे ठरवणार का? 

शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला होता. राहुल नार्वेकर हे भाजप नेते आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा असली तरी ते सध्या राजकीय हेतूने काम करत आहेत. नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "आता अंबादास दानवे यांनी आम्हाला प्रोटोकॉल सांगावा की त्यांनी कसं राहावं, कसं खावं, कसे कपडे घालावे, कसं बसावं, कुणाशी कसं बोलावं, कोणत्या गाडीत बसावं. अंबादास दानवे अत्यंत क्वालिफाईड व हुशार व्यक्ती आहेत. ते एक चांगले वकील देखील आहेत. आताच त्यांनी सभागृहाचं कामकाज चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. आता तुमच्या निकालाची वेळ आली तर तुम्हाला त्यांचे वाकडे दिसत आहे का? मला अंबादास दानवे यांचं आश्चर्य वाटत आहे आता मुख्यमंत्री व मंत्र्यांचा प्रोटोकॉल ते ठरवतील का?"

हेही वाचा

Jalgoan News : खडसेंनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये, महाजनांचं टीकास्त्र; खडसेंचही प्रत्युत्तर म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजीSantosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊतJalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो; माजी सहकाऱ्याचा बोचरा वार; बचावासाठी नितीश राणाची सुद्धा वादात उडी
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Aaditya Thackeray Viral Video: तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Embed widget