एक्स्प्लोर

Bala Nandgaonkar on Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' कृतीमुळे कौतुकाचा वर्षाव; मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले, सध्याच्या राजकारणातील 'कोहिनूर'

Bala Nandgaonkar on Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे बघायला मिळाले आहे.

Dharashiv News : राज्यभरात पावसाने एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे. त्यातच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलं आहे. याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv News) अनेक गावांना बसला आहे. स्थानिक प्रशास आणि एनडीआरएफच्या (NDRF) पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. अशातच धाराशिवाचे (Dharashiv News) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे बघायला मिळाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती देत एनडीआरएफ टीमचेही आभार मानले आहे. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांची मदतकार्य पाहून मनसेचे नेते बाळ नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी देखील खासदार ओमराजेंचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?

धाराशिव जिल्ह्याच्या वडनेर ता. परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एका आजीसह 2 वर्षाचा मुलगा आणि 2 व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते. सोबतच स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने ते अडकले होते. परिणामी NDRFच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी 8 वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले..! या कार्यात NDRFच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!

सध्याच्या राजकारणातील कोहिनूर- बाळा नांदगावकर

नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खुप चांगल्या भावना नाही. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले. त्यामुळेच सुमारे 3.30 लाख मतांनी निवडून आले. ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे. तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे. असेही बाळा नांदगावकर त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले आहे.

राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून अभिमान

सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड वर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे. या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढी ने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणात ही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी. ओम तु लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहे ते उत्कृष्ट असेच आहे, पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे.राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खुप अभिमान आहे. असेही बाळा नांदगावकर त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले आहे.

आणखी वाचा

Solapur Heavy Rain: सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
Embed widget