Devendra Fadnavis: बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्यांचे...; देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश
Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case: बीड प्रकरणातील (Santosh Deshmukh) (संतोष देशमुख हत्या प्रकरण) फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसेच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले आहेत.
देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा खून-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.
अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात- संजय शिरसाट
अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे महिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर त्यांच्ये मृतदेह कुठ आहेत सरकार तुमच्या पाठीशी उभ आहे. बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळं बिघडत आहे, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. तसेच आरोपींना तातडीने अटक केला जाईल. 6 एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणारं नाही, असंही संजय शिरसाट यांनी सांगितले.
संजय गायकवाडांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
बीड जिल्ह्यात संपूर्ण राज्यात नव्हे इतके गुन्हेगार व खंडणीचे प्रकरण आहेत. बीड जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात शस्त्राचे परवाने देण्यात आले आहेत तर जिल्ह्यात अनेक खंडणीखोर गुंड असून वाल्मीक कराड हा त्यातील एक असून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे तिकडे खुलेआम गुंडगिरी असते. 1992 साली एका राजकीय नेत्याच्या घरून एक आयएएस अधिकारी गायब झाले. ते अद्याप पर्यंत सापडलेले नाही. या शिवसेना संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून नेमका तो राजकीय नेता कोण? व गायब झालेला आयएएस अधिकारी कोण? असे प्रश्न आता समोर उपस्थित होत आहेत.