एक्स्प्लोर
शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव : मुख्यमंत्री
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाआडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव आहे. शेतकरी आणि पोलिसांची झटापट होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडावी, असं त्यांचं नियोजन आहे, असा गंभाीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, चर्चेने तोडगा काढू. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र या संपाद्वारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
"संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. शेतकऱ्याचं दूध, भाजीपाला अडवला जात आहे. संघर्ष यात्रेला प्रतिसाद न मिळाल्याने, आता शेतकऱ्यांच्या आडून हिंसेचा डाव आखला जात आहे", असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.
राज्य सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. यापुढेही शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढू, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
दगडफेकीमागे राजकीय पक्षांचा हात
शेतकरी संपादरम्यान अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दगडफेकीच्या घटना घडल्या. मात्र या दगडफेकीच्या घटनांमागे राजकीय कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. दगडफेक करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्यामागे काही राजकीय लोक आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दुधाला भाव द्या
अहमदनगर जिल्ह्यातील दूध खरेदी नाकारणाऱ्या दूध संघांनाही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. दुधाला दूध संघांनीच योग्य भाव द्यावा. कारण नगर जिल्ह्यात दूध संघ 25 रुपयांनी दूध खरेदी करुन, तेच दूध मुंबईत 60 रुपयांनी विकतात. त्यामुळे दूध संघांनीच योग्य भाव द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
सरसकट कर्जमाफी अशक्य
सरसकट कर्जमाफी कुठल्याही सरकारला शक्य नाही. यूपीएच्या काळात कर्जमाफी झाली त्यावेळी महाराष्ट्रात सात हजार कोटी रुपयांची आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. सरसकट कर्जमाफीची भावना तयार केल्याने नियमिय कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना परावृत्त केल्याने, बँका अडचणीत येतील. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल असा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही शेतकरी कर्जमाफीला नाही म्हटलेलं नाही. राज्य सरकार 31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना बनवत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
- मी एकटा पडल्याचं कारण नाही. राज्य सरकार चालवणं सामूहिक जबाबदारी आहे. काही जण आपली जबाबदारी झटकत असतील, पण आम्ही आमची जबाबदार पार पाडू : मुख्यमंत्री
- आम्ही चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहे, शेतकऱ्यांनी चर्चा करावी : मुख्यमंत्री
- संप फार काळ चालणं शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांचंच आहे. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर मार्ग निघावा : मुख्यमंत्री
- दगडफेक करणारे शेतकरी नाहीत, त्यांच्यामागे काही राजकीय लोक आहेत - मुख्यमंत्री
- नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही राज्य सरकार निश्चितच विचार करेल - मुख्यमंत्री
- सरसकट कर्जमाफी कुठल्याही सरकारला शक्य नाही : मुख्यमंत्री
- UPA च्या काळातील कर्जमाफी झाली त्यावेळी महाराष्ट्रात सात हजार कोटी रुपयांची आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली होती : मुख्यमंत्री
- सरसकट कर्जमाफीची भावना तयार केल्याने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना परावृत्त करणे आणि बँका अडचणीत येतील : मुख्यमंत्री
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल असा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री
- 15 जूनपर्यंत तूर खरेदीला वाढ देण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. विश्वास आहे की ही वाढ मिळेल : मुख्यमंत्री
- काही राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे की हे आंदोलन चिघळावं : मुख्यमंत्री
- डाळींचे भाव, शेतमालाचे भाव गेल्या सरकरच्या तुलनेत अधिक आहेत : मुख्यमंत्री
- तुलनात्मक दृष्ट्या या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले : मुख्यमंत्री
- दुधाचे भाव 4 रुपयांनी वाढले आणि ते आणखी वाढले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील : मुख्यमंत्री
- आरे चे नवीन ब्रँड आम्ही आणतोय जे मार्केटमध्ये येतील : मुख्यमंत्री
- सातत्याने दुष्कळ असून कृषीचा विकासदर साडे बारा टक्क्याने वाढलाय : मुख्यमंत्री
- जे संप करतायेत त्यांना आवाहन करतो की राज्य सरकारसोबत काम करावं, त्यांची मदत आणि सल्ले आम्ही घेऊ इच्छितो : मुख्यमंत्री
- पुढचे 2 ते 3 वर्षे विकासदर ठेऊ शकलो तर शेतकऱ्याला निश्चित फायदा होईल : मुख्यमंत्री
- उत्पादकतेत महाराष्ट्र खाली असल्याने हमी भाव परवडत नाही, त्यामुळे उत्पादकता वाढवण्याचं काम आम्ही करतोय : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement