एक्स्प्लोर

सिग्नलवर शिकणारी मुलं जाणार इस्रोला, जगण्याची भ्रांत असलेल्या मुलांचा प्रेरक प्रवास

जगण्याचा संघर्ष असणारी अनेक लोकं समाजात वावरत असतात. मात्र या संघर्षातून देखील यशाच्या वाटा चोखंदळत नवे परिमाण स्थापित करण्याची जिद्द काही लोकांमध्ये असते. अशाच एका जिद्दीची ही कहाणी आहे.

ठाणे : ठाण्याच्या सिग्नल शाळेतील मुलांना थेट इस्रोला भेट द्यायची संधी मिळणार आहे. जगण्याची भ्रांत असलेल्या मुलांच्या या प्रेरक प्रवासाने या परिसरात आनंदाची लहर आली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिग्नल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावला. यामुळे त्यांना आता थेट पाच दिवस इस्रो पहायची संधी देण्यात आली आहे. नेमकी ही सिग्नल शाळेतील मुलं या शाळेत नेमकी शिक्षण कशी घेतात? आणि या खडतर परिस्थितीतून त्यांनी नेमका असा कोणता प्रयोग सादर केला? याची सध्या चर्चा आणि या मुलांचे कौतुक होताना दिसत आहे. ठाण्यातील तीन हात नाकावर असलेल्या सिग्नल शाळेतील किरण काळे आणि अतुल पवार हे विद्यार्थी जे आता अनेकांचा स्वप्न असलेली थेट इस्रोवारी करणार आहेत. डोंबिवलीमध्ये भरलेल्या विद्यान प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. दुष्काळी भागातून आल्यामुळे पाण्यासंबंधी काहीतरी प्रयोग सादर करावा त्यांच्या डोक्यात आलं आणि शिक्षकांच्या सहकार्याने त्यांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठीचा प्रयोग तयार केला. काय आहे ही सिग्नल शाळा जे मुलं सिग्नलवर काम करतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशासाठी ही सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. त्यात अतुल पवारसारखा विद्यार्थी रात्री सिग्नलवर लाईट खाली अभ्यास करत जिद्दीने आपलं स्वप्न पूर्ण करतोय. आपण कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं, अशा इस्रोमध्ये त्याला पाच दिवस राहायला मिळणार आहे. 13 ते 17 एप्रिल दरम्यान हे विद्यार्थी इस्रोला भेट देऊन त्याठिकाणी चालणाऱ्या कामाची माहिती घेणार आहेत. सिग्नलवर काम करत थेट आपण सादर केलेला प्रयोग आपल्याला इस्रो दर्शन घडवू शकतो हे माहीत झाल्यावर घरच्यांना सुद्धा आपल्या पोरांवर विश्वास बसत नाहीये. मात्र, कठीण परिस्थितीवर मात करत शालेय वयात या प्रकारच्या नव्या संकल्पना सत्यात उतविणारे हे विद्यार्थी इतरांसाठी एक वेगळी शिकवण देऊन जात आहेत. मेहनत जिद्द, चिकाटी याच्या बळावर आज या सिग्नल शाळेच्या मुलांनी हा प्रयोग सादर करून थेट इस्रो गाठलं आहे. इस्रो वारी अनेकांसाठी स्वप्नवत असते मात्र हेच स्वप्न या दोघांनी सत्यात उतरवून इतरांसाठी एक उदाहरण समोर आणलं आहे. यामुळं या दोघांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
Dia Mirza Video : सणांच्या तोंडावर वाद उकरून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा अजेंडा; दिया मिर्झा व्हिडीओ वादात रोहिणी खडसेंची उडी
सणांच्या तोंडावर वाद उकरून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा अजेंडा; दिया मिर्झा व्हिडीओ वादात रोहिणी खडसेंची उडी
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget