(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंचा संजय शिरसाट, अतुल सावेंना मोठा धक्का; संभाजीनगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवबंधन बांधणार!
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. येथे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येथील अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) संपल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीच तयारी चालू केली आहे. विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल, यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. काही पक्षांनी तर वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी योग्य उमेदवारांचा शोधही चालू केला आहे. असे असतानाच शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठी खेळी खेळली आहे. येथे लकवरच भाजपाचे (BJP) अनेक माजी नगरसेवर, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना मोठा धक्का बसणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची ठाकरेंच्या या खेळीमुळे अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या प्रयत्न केला आहे.
7 जुलैला होणार पक्षप्रवेश सोहळा
उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकाने गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय?
भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भवना आहे, याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असं आम्हाला वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केलं होतं. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, असे राजू शिंदे यांनी सांगितले.
कोण, किती पदाधिकारी करणार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश?
6 ते 8 माजी नगरसेवक
1 जिल्हा परिषद सदस्य
2 पंचायत संमती सदस्य
1 तालूका अध्यक्ष
1 युवा मोर्चा अध्यक्ष
5 मंडळ अध्यक्ष
हेही वाचा :
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?