एक्स्प्लोर

Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत. आगामी निवडणूक खडकवासला आणि हडपसर, दोन्हींकडून लढू शकतो, असे वसंत मोरे यांनी म्हटले. वसंत मोरे हे येत्या 9 जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

पुणे: मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. 'साहेब मला माफ करा', असे मी त्या मेसेजमध्ये लिहले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा फोन आला होता. पण आता खूप उशीर झाला आहे मी त्यांना ठीक आहे बोललो, पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलोच, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलत होते.

वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील. याबाबत बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या 18-19व्या वर्षी मी इकडेच शिवसेनेची शाखा सुरु केली. 31 वर्षांचा होईपर्यंत मी शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 9 जुलैला मी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

कुठल्याही प्रलोभानापोटी मी  शिवसेनेत जात नाही. उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल. विधानसभा का महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवले जाईल. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळे लक्षात घेता वंचित पक्ष सोडला. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी माझं काम केलं नाही. त्यामुळे माझे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशी या गोष्टी संदर्भात चर्चा झाली होती, असेही वसंत मोरे यांनी म्हटले.

वसंत मोरे फक्त निवडणूक लढायला वंचितमध्ये गेले होते: संजय राऊत

वसंत मोरे फक्त लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीत गेले होते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. अनेक लोक निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातात. गोपीचंद पडळकरही निवडणूक लढायला वंचितमध्ये गेले होते, मग त्यांचं काय? लोकशाहीत आणि राजकारणात लोक पक्षांतर करतात, भूमिका बदलतात. आमचे 40 आमदार गेले, पण आम्ही त्यांचा पराभव करु. या देशात लोकशाहीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लोकशाही मान्य असली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Bhagirath Chaudhary: भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
भाजपच्या केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्रालयाकडून शेतीच्या अनुदानपोटी 99 लाख लाटले, बोभाटा होताच नाईलाजाने केले परत
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget