Rohit Pawar: पुढील दोन-तीन महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar On ED Action : छत्रपती संभाजीनगरमधील ज्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने (ED) कारवाई केली, त्या कारखान्याला रोहित पवारांनी आज भेट दिली.
Rohit Pawar On ED Action : माझ्याविरोधात काहीही सापडलं नाही म्हणून लोकसभेच्या आचारसंहितेच्या (Lok Sabha Code Conduct) दोन दिवस अगोदर नोटीस दिली. त्यांची इच्छा आहे मी त्यांच्याकडे यावं, आता फक्त अटकेची कारवाई बाकी आहे. पुढील काळात मी असेच फिरत राहिलो, तर पुढील दोन-तीन महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल असे वक्तव्य रोहित पवारांनी (Rohit Pawar) केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ज्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने (ED) कारवाई केली, त्या कारखान्याला रोहित पवारांनी आज भेट दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्याच्या (Sugar Factory) कर्मचारी यांच्याशी संवाद साधतांना त्यांनी आपल्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "आज लढण्याची वेळ आली असून, आम्ही सर्वजण लढतोय. सर्व म्हणतात हा कमी किमतीत कारखाना घेतला, मग तुम्ही का घेतला नाही. आम्ही जमिनीसाठी आलेलो नाही, इथे कारखाना चालविण्यासाठी आलेलो आहे. ईडीने सोशल मीडियावर कारखान्याला नोटीस टाकली, मात्र अजूनही ती नोटीस माझ्या हातात आलेली नाही. आम्ही घाबरत नाही, आम्ही कधीही घाबरणार नाही. कारवाई का होत आहे, कारण मी त्यांचं ऐकत नाही. मी भाजपसोबत जात नसल्याने कारवाई केली जात आहे. ईडीला मी सर्व सहकार्य केलं, सर्व उत्तरे मी दिली आहे. मी असंच फिरत राहिलो, तर मला काही दिवसांत अटक होणार आहे. मला देखील हे माहित आहे. असे असतांना मी तुमच्यासोबत राहील. मी दिल्लीसमोर झुकणार नाही आणि घाबरणार देखील नाही. तसेच जे लोकं त्रास देत आहेत त्याना आम्ही सोडणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
माझं कुटुंब तणावात आहे
ईडीकडून काढण्यात आलेली प्रेसनोट चुकीची आहे. जिथे काळा पैसा वापरला जातो तिथे तशी नोटीस दिली जाते. पीएमएलए ॲक्टमध्ये हा विषय येत नाहीत. मी अडचणीचा ठरत असल्याने कारवाईला वेग आला आहे. आता जेल शिवाय कुठलीही कारवाई राहिलेली नाही. मी घाबरलेलो नाही. पण माझं कुटुंब तणावात आहे. मी त्यांना सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. याआधी अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकले आहे. काही लोकं भूमिका बदलून पलीकडे गेले आहे. केजरीवाल यांच्याबाबतीत देखील तेच सुरू असल्याचे रोहित पवार म्हणाले.
लोकं म्हणतात तुझ्यावर ईडीची कारवाई चालू आहे...
जिथे गरज पडेल तिथे मी प्रचार करेल. माझी काय भीती वाटते ते त्यांना विचारा. मी सर्वसमांन्य माणसांचे मुद्दे मांडतोय. गुजरातचा कांदा मार्च अखेरीस येतो. गुजरातच्या शेतकऱ्यासाठी मुदत वाढवली का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. तसेच, मला लोकं म्हणतात तुझ्यावर ईडीची कारवाई चालू आहे, कशाला लोकांचे प्रश्न मांडतो. मी त्यांना म्हणालो, मी अधिवेशनात काय मजा मारायला आलो आहे का?, हो लोकांचे प्रश्न मांडणारच, असेही रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :