ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
दोन्ही भाऊ एकत्र आले तर मलाही आनंद आहे. पण उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अंतिम टप्यात एकत्र यावं, असे मत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

Bhaskar Jadhav : दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राप्रमाणे मलाही आनंद आहे. पण उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अंतिम टप्यात एकत्र यावं. विश्वासातली चार माणसे पाठवून प्रस्तावावर आधी व्यवस्थित चर्चा करावी असे मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांच्या प्रस्तावाचे मी त्यावेळीही स्वागत केले होते असे जाधव म्हणाले.
दोन भाऊ एकत्र येणार नसून दोन पक्ष एकत्र येणार आहेत. त्यामुळं राज्यातील निवडणुकांमधील जागा वाटपाच्या संदर्भात आपापली क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, असेही भास्कर जाधव म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच प्रकल्प कोकणात आला
कोका कोला प्रोजेक्टच्या गेटवर पोलिस अधिकारी वॉचमन असल्यासारखे उभे राहतात. कंपनी स्थानिकांवर अन्याय करते ही सत्य परिस्थिती असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच प्रकल्प कोकणात आला आहे. मात्र, श्रेय इतर लोक घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी MIDC मध्ये बोलावलेल्या बैठकीला कोकाकोला कंपनीच्या प्रशासनापैकी कोणीही हजर नव्हता. कंपनीच्या गेटवर कोणी गेलं तर त्याला कारवाईची भीती दाखवली जाते. देवेंद्र फडवीस यांच्या आदेशानेच पोलिस वागत असल्याचा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला आहे. कंपनी कडून मला बोलावले गेले असताना पोलिसांनी आम्हाला आत जाऊ दिले नाही असे भास्कर जाधव म्हणाले. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करू नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे.
वेळेआधी पाऊस झाल्याने आंबा, काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
कोकणात वेळेआधी पाऊस झाल्याने आंबा, काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल्यामुळे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पण त्या पत्रावर अजून पोहोच नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ता कायमस्वरूपी नाही. ज्यावेळी सत्ता जाईल तेव्हा भाजपासह त्यांच्या सोबतचे इतर पक्ष कोलमडून पडतील असेही भास्कर जाधव म्हणाले. भाजपने स्वतःचा पराभव मान्य केला पाहिजे असेही जाधव म्हणाले. विकास करुन आपण नेतृत्व निर्माण करु शकत नाही हे भाजपला मान्य करावं लागेल. दुसऱ्या पक्षातील तयार झालेली नेतृत्व चोरल्याशिवाय गत्यंतर नाही हे भाजपला समजल्याचे भास्कर जाधव म्हणाले. म्हणून इतर पक्षातील लोकं चोरण्याचा प्रकार सुरु असल्याचे ते म्हणाले.
नेहरु, गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय सरकारकडे काही नाही
केंद्र सरकारमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्याचे धाडस आहे का? असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी केला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय झालं यांची माहिती संसदेत दिली. आपले पंतप्रधान का घाबरतात? असा सवालही जाधवांनी केला. विशेष अधिवेशन बोलावून पंतप्रधान स्वतः हजर राहिले नाहीत. नेहरु, गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय सरकारकडे काही नाही. फक्त नाटकबाजी आणि भाषण करून सत्ता जिंकणे एवढंच कळत अशी टीका जाधव यांनी केली. युद्ध हरलो की जिंकलो हे पार्लमेंटमध्ये सांगायला पाहिजे असे भास्कर जाधव म्हणाले. सरकारकडे नैतिकता नाही. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे धाडस यांच्याकडे नाही असेही भास्कर जाधव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























