एक्स्प्लोर
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
देशातील सर्वात लांब 701 किमीचा महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या समृद्धी महामार्गाचा 4 था आणि शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला.
Samruddhi highway 4th phase inauguration
1/9

देशातील सर्वात लांब 701 किमीचा महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या समृद्धी महामार्गाचा 4 था आणि शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला.
2/9

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात 76 किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले.
3/9

तब्बल 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत आजपासून पूर्ण क्षमेतेने सुरू झाला आहे. या महामार्गास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे.
4/9

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला.
5/9

समृद्धी महामार्ग हा 701 किमी मुंबई ते नागपूर जलदगती महामार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या महामार्गाकडे पाहिले गेले. भारतातील सर्वात लांब महामार्ग असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा व 2.6 लाख किमी प्रवासाचे जाळे निर्माण करणारा हा महामार्ग आहे.
6/9

या महामार्गालगत 3 आंतरराष्ट्रीय आणि 7 डोमेस्टीक विमानतळं आहेत. तसेच 2 मोठी आणि 48 लहान पोर्ट (बंदरे) आहेत. 6000 किमी रेल्वे नेटवर्कशी जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे.
7/9

या महामार्गावरुन 120 किमी प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. महामार्गालगत 11 लाख 50 हजार वृक्षांची लागवड करण्यात आलीय. देशातील पहिला संपूर्ण पर्यावरणपूरक हा महामार्ग ठरणार असल्याचे सांगितले जाते.
8/9

पायाभूत सुविधा आणि दळणवळण गतीमान करण्याच्या उद्देशाने हा महामार्ग महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेणारा असल्याचे सरकारने म्हटलं आहे.
9/9

दरम्यान, समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटींची खर्च अपेक्षित होता. पण, हा खर्च 61 हजार कोटींवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे.
Published at : 05 Jun 2025 08:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
























