MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन
नाशिक : राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच तिकडे नाशकात दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही झाल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचं दिसून आलं. शिवसेना ठाकरेंच्या जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशींसह अनेक पदाधिकारी मनसे कार्यालयात उपस्थित राहिले. त्यामुळे डोंबिवलीनंतर आता नाशकातही दोन्ही ठाकेरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आले.
Nashik MNS Shiv Sena Alliance : मनसेच्या वास्तूशांतीच्या पूजेला ठाकरेंचे कार्यकर्ते
एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेने जोर धरला असताना नाशिकमध्ये त्यापुढचे पाऊल पडले आहे. नाशिक मनसेने त्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी वास्तूशांती पूजेचे आयोजन केले होते. त्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होताना दिसत आहे.


















