Marathwada Water Shortage : मराठवाड्यात टँकर संख्या एका हजार पार! 51 तालुक्यांवर पाणी संकट, भूजल पातळीत घट
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली असून, जवळपास 51 तालुक्यावर भीषण जलसंकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालीय.
Marathwada Water Crisis : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईला (Water Shortage) तोंड द्यावे लागत आहे. मराठवाड्यात (Marathwada) तर भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली असून, जवळपास 51 तालुक्यावर भीषण जलसंकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालीय. मराठवाड्यात सद्यस्थितीला टँकरची (Tanker) संख्या ही जवळपास 1 हजार पर्यंत पोहचली आहे. तर, पुढील दहा दिवसांत यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
उन्हाचा कडाका वाढत असल्याने याच परिणाम देखील जाणवत आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 51 तालुक्यात भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक 2.28 मीटर भूजल पातळी परभणी, तर त्या खालोखाल 2.13 मीटर लातूर जिल्ह्यामध्ये घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मराठवाड्यातील 875 विहिरींची पाणी पातळी तपासली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. मराठवाड्यात महिनाभरानंतर पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याचे चिन्हे दिसत असून, मराठवाडा पुन्हा टँकरवाडा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती टँकर?
- छत्रपती संभाजीनगर : 443
- बीड : 117
- जालना : 321
- लातूर : 08
- धाराशिव : 63
- परभणी : 01
मराठवाड्यात एकूण 809 गाव-वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा...
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यात आजघडीला तब्बल 1 हजार टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मराठवाड्यातील 639 गाव आणि 170 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ज्यात 13 शासकीय आणि 900 पेक्षा अधिक खाजगी टँकरचा समावेश आहे.
भूजल पातळी घटली, जिल्हानिहाय आकडेवारी...
जिल्हा | विहिरी तपासणी | भूजल घट |
छत्रपती संभाजीनगर | 141 | 1.17 |
जालना | 110 | 0.02 |
परभणी | 86 | 2.28 |
लातूर | 109 | 2.13 |
धाराशिव | 114 | 1.74 |
बीड | 126 | 0.44 |
हिंगोली | 55 | 0.01 (वाढ) |
नांदेड | 134 | 0.22 (वाढ) |
एकूण | 875 | 0.98 |
इतर महत्वाच्या बातम्या :
सोलापुरात भीषण पाणीटंचाई; उजनी धरण मायनस 37.09 टक्क्यांवर, 93 फूट विहिरीने तळ गाठला