एक्स्प्लोर

चिंता वाढली! गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 90 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 32 टक्के पाणी

Jayakwadi water storage update : आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

Jayakwadi water storage update : यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यातच पावसाने देखील पाठ फिरवल्याने मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील अनेक प्रकल्प कोरडी पडली आहे, तर इतर प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाले आहे. दरम्यान, मराठवाड्याची तहान भागावणारा जायकवाडी (Jayakwadi) धरणाचा पाणीसाठा (water storage) देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण, गेल्यावर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणात 89.97 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा हाच पाणीसाठा 32.56 टक्के आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती!

  • धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1506.68 फूट 
  • धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.236 मीटर 
  • एकूण पाणीसाठा दलघमी : 1444.872 दलघमी
  • जिवंत पाणीसाठा दलघमी : 706.766 दलघमी
  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 32.56 टक्के 
  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा
  • मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 1953.200 दलघमी
  • मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 89.97% टक्के 
  • जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.671 
  • जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 2537  क्युसेक
  • 1 जुन 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 188.23 दलघमी (06.65 टीएमसी)
  • 1 जुन 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी

मराठवाड्यात आतापर्यंत पाऊस... (मिलिमीटरमध्ये) 

जिल्हा  गतवर्षी झालेला पाऊस  यावर्षी झालेला पाऊस  गेल्या 24 तासातील पाऊस 
औरंगाबाद  359  238 0.6
जालना  461 252 0.8
परभणी  449 273 0.1
नांदेड  753 577 1
हिंगोली  608 429 0.7
बीड  667 240 0.3
उस्मानाबाद  364 267 1.7
लातूर  465 316 2.3

विभागात 78 टँकर सुरु 

पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सध्या 55 गाव आणि 22 वाड्यावर 78  टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सात शासकीय आणि 71 खाजगी टँकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 28 गाव आणि 4 वाड्यांवर एकूण 35 टँकर सुरु आहेत. जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर एकूण 36 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

शेतकऱ्यांची चिंता वाढली...

मागील वर्षे सुरवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे यंदा तरी चांगले उत्पादन होईल अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल झाले. त्यातच आता जुलै महिना संपला असतांना देखील नांदेड जिल्हा सोडला तर विभागात अजूनही कोठेही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Osmanabad Water Storage Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पात 7 टक्के पाणीसाठा शिल्लक; 34 प्रकल्प कोरडेठाक

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget