एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet: शिंदेसेनेच्या 'त्या' पाच मंत्र्यांना हटवा, भाजप हायकमांडचे आदेश; मराठवाड्यातील तिघांचा समावेश

Maharashtra Cabinet : शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटवण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे.

Maharashtra Cabinet : शिंदेसेना आणि भाजपमध्ये (BJP) सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) मोठी बातमी समोर येत आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटाच्या (Shinde Group) पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत असून, याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त दिले आहे. तसेच या पाचही मंत्र्यांच्या जागी नवीन लोकांना संधी देण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. ज्यात रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulab Patil), अन्न वं औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पाहायला मिळत आहे. यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असल्याची चर्चा आहे. असे असताना सद्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील नेते नाखूष असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना मंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत सापडले असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटवण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी आपल्याला साथ देणाऱ्या लोकांना आता मंत्रीपदावरून कसे हटवावे असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस अज्ञातवासात गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मराठवाड्यातील तिघांचा समावेश... 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर या सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल याचा अभ्यास करण्यात आला. ज्यात शिंदे गटातील पाच 5 मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले असून, त्याचा अहवाल भाजप हायकमांडला देण्यात आला आहे. तर या पाच मंत्र्यांमध्ये संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. तर ब्लॅकलिस्टमधील पाचही मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Shrikant Shinde : शिंदे गट- भाजपमध्ये वादाची ठिणगी? डोंबिवलीतील वादावर श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget