एक्स्प्लोर

अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बीआरएस पक्षाच्या सभेचं ठिकाण ठरलं; असं असणार नियोजन

Maharashtra Politics : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केसीआर यांनी  महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे.

Maharashtra Politics : भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी देशभरात पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. ज्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Legislative Assembly-Lok Sabha Elections) डोळ्यासमोर ठेवत केसीआर यांनी  महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहे. तर तिसरी सभा आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात होत आहे. 24 एप्रिलला ही सभा होणार असून, सभेचं ठिकाणी देखील जाहीर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) आमखास मैदानात 24 एप्रिल रोजी बीआरएस पक्षाची सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. 

भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्ष मराठवाड्यात पाय रोवताना दिसत आहे. नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या सारख्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.  तर आता शहरातील आमखास मैदानात 24 एप्रिल रोजी बीआरएस पक्षाची सभा देखील होणार आहे. विशेष म्हणजे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. तर या सभेत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचा पक्षप्रवेश देखील केला जाणार आहे. सोबतच आगामी काळात बीआरएस पक्ष जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती देखील यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. यावेळी हैद्राबादच्या जहिराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार बी.बी. पाटील, अरमुर विधानसभाचे आमदार जीवन रेड्डी आणि बोधन  विधानसभाचे आमदार शकील आमिर उपस्थित होते. 

मराठवाडा केंद्रबिंदू...

भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्ष मराठवाड्यात पाय रोवताना पाहायला मिळत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षाला वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याची सुरवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेड जिल्ह्यात के चंद्रशेखर राव यांनी दोन भव्य सभा घेतल्या आहे. अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर के चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन मोठे नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. दरम्यान 24 एप्रिलला होणाऱ्या सभेत देखील अनेक स्थानिक नेते बीआरएसमध्ये प्रवेश घेणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एन्ट्री करणाऱ्या बीआरएससाठी मराठवाडा मात्र केंद्रबिंदू ठरत  आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! मराठवाड्याची राजधानी छ. संभाजीनगरमध्ये 'बीआरएस'ची 24 एप्रिलला जाहीर सभा, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राहणार उपस्थित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget