Nagpur Blast : एशियन फायर वर्क्स ब्लास्ट कंपनी प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंचा धक्कादायक खुलासा; कडक कारवाईचे ही आदेश!
Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या कोतवाल बड्डी एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या ब्लास्ट प्रकरणी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Nagpur Blast News : नागपूर जिल्ह्यातील कोतवाल बड्डी एशियन फायर वर्क्स (Asian Fire Work) या कंपनीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या ब्लास्ट प्रकरणी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. 1 जुलै 2023 ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रियल डिपार्टमेंटने या कंपनीला बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र ही नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती. हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे यावर पोलिसांनी आणि जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा बावनकुळेंनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी केली जाणार असून जे जे दोषी आहे. मग तो मॅनेजर असो किंवा मालक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दोषपूर्ण इंडस्ट्री चालविणे हा फार मोठा गुन्हा- चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील कोतवालबड्डी शिवारातील एशियन फायर वर्क्स या एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये (Explosives Manufacturer Company) मोठा स्फोट (Massive Blast) झाल्याची घटना घडली होती. दरम्यान यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवाराला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे जखमींना सुद्धा उपचार दिले जात आहे. दोषपूर्ण इंडस्ट्री चालविणे हा फार मोठा गुन्हा आहे. या बद्दल संपूर्ण चौकशी होऊन कारवाई केली जाणार असल्याची भाजप नेते आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.
दोषी असणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होणार- चंद्रशेखर बावनकुळे
या प्रकरणी अजून अटक कोणाला झाली नाही. परंतु या कंपनीला क्लोजर नोटीस दिली असताना नियमाला डावलून ही कंपनी सुरू होती. त्यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होणार आहे. ज्या ज्या बाबी पाळून आणि नियमांचं पालन करून इंडस्ट्रीत चालली पाहिजे. तसं होत नसेल तर नक्कीच कारवाई होईल. कारण या ठिकाणी दारूगोळा तयार होतो, हे फार सेफ्टीच काम आहे. त्यामुळे नियंत्रण झालं नाही तर ब्लास्ट होतात. या कंपनीने नियमच उल्लंघन केले आहे. हा सिरिअस गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. किंबहुना त्यासाठीच मी या ठिकाणी भेट दिली आहे. परिवारांना न्याय मिळाला पाहिजे, असे ही बावनकुळे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
