Chandrashekhar Bawankule : सुरेश धस यांना शांत रहा, असे भाजपने कधीही सांगितलं नाही; उलट धस आणि धनंजय मुंडेंनी एकत्रित काम केलं तर..; चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

Chandrashekhar Bawankule: सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूर्ण पाठबळ दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या कारवाया झाल्या आहेत, ज्या चौकशीबाबत सुरेश धस यांनी मागणी केली आहे, त्या सर्व फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून देखील पूर्ण पाठबळ सुरेश धस यांच्या पाठीमागे आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एकत्रित काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, ही आमची भूमिका असल्याचा मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सुरेश धस यांना शांत रहा, असे भाजपने कधीही सांगितले नाही. सुरेश धस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पडत आहे. सुरेश धस योग्य पद्धतीने प्रकरण हाताळत आहे. त्यांना कोणते आदेश देण्याचे कारण नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीचे शिक्षा येईपर्यंत सुरेश धस प्रयत्न करतील असं मला विश्वास आहे. दरम्यान, आरोप प्रत्यारोप होत असतील, मात्र तपास यंत्रणा तपास करतील. अजित पवारांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ते निर्णय घेतील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
...म्हणून त्यात आम्ही मध्यस्थी करण्याची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांची भूमिका पूरक आहे. दोघांची भूमिका वेगळी नाही. पण काही ठिकाणी मतभेद आहे. सुरेश धस यांनी आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे त्यासाठी पार्टी त्यांच्या पाठीशी आहे. काही ठिकाणी त्या दोघांमध्ये मतभेद आहे, आणि त्यात आम्ही मध्यस्थी करण्याची गरज नाही. पण मला वाटते मनभेद असू नये. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सर्वांनी मिळून एकत्र भूमिका घेतली तर आरोपींना नक्की शिक्षा होईल- चंद्रशेखर बावनकुळे
मी दोघांनाही बोललो पण यात राजकीय भूमिका जुळवून घ्या, गळाभेट करा, असे काही नव्हतं. बीडचा विकासाचं काम करावं, या बाबीचा फटका बीडच्या विकासाला बसू नये, देशमुख हत्या प्रकरणात आपण सर्वांनी मिळून एकत्र भूमिका घेतली तर आरोपींना नक्की शिक्षा होईल.
भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आज पक्षप्रवेश झाले आहे. आगामी काळात महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल. 16 आणि 19 तारखेला आमचं घर चलो अभियान आहे. अशी माहिती ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मूळ भूमिकेशी तडजोड करायला नको होती
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडून दिला आहे. अविचारी पक्षासोबत युती केली आहे. उद्धव ठाकरे यांना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मूळ भूमिकेशी तडजोड करायला नको हवी होती. खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायला तयार नाही. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना त्यांच्याकडून पक्ष सांभाळण्याचं खूप काही काम झालं नसल्याची टीका ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात चांगलं वाळू धोरण, जेवढी मागणी, तेवढा पुरवठा- चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रात चांगलं वाळू धोरण येत आहे. 18 (फेब्रुवारी) तारखेच्या बैठकीत आम्ही अंतिम वाळू धोरण जाहीर करतोय. सर्वसामान्य व्यक्तीला स्वस्त वाळू मिळेल. जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा केला जाईल. त्यामुळे अवैध आणि गैरप्रकार होणार नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भास्कर जाधव हे पहिल्यापासूनच कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत. त्यांची आताची भूमिका मला माहित नाही, त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. आमच्या पक्षात कोणी आलं तर मी तसं काही बोलणार नाही, भास्कर जाधव यांना जो निर्णय घ्यायचा आहे त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप 100% महायुतीच्या बाजूने जात आहे. काही ठिकाणी स्थानिक लेवलला देखील विचार करावा लागते. भाजपचा मुद्दा आहे महायुतीनेच पुढे जायचा आहे. असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























