एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमध्ये उद्योगांमुळं होणाऱ्या प्रदुषणाचा आरोग्यावर परिणाम, प्रभावी उपाययोजना करण्याच्या मंत्री मुनगंटीवारांच्या सूचना

चंद्रपूर (Chandrapur) शहर परिसरात असणाऱ्या उद्योगांमुळं वायू, जल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

Sudhir Mungantiwar: चंद्रपूर (Chandrapur) शहर परिसरात असणाऱ्या उद्योगांमुळं वायू, जल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर दर्जेदार कार्यपद्धती अमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमधून प्रदुषण होत असल्यानं त्यावर उपाययोजन करण्यासंदर्भात मंत्री  मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 

मंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सूचना 

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाला प्रदूषणमूक्त करुन सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण पूर्ण करावे. तसेच प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रम राबवावा. प्रदूषण दाखविणारा डिजिटल फलक शहरात प्रमुख चौकांमध्ये लावावा. प्रदूषण पातळीवरून नागरिकांनी कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावरील परिणामांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत केल्या.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत

प्रदूषणाबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायदे, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्णय आदींबाबत छोट्या- छोट्या पुस्तिका तयार कराव्यात असेही मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. नागरिकांना याबाबत जागरूक करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत. तसेच जिल्ह्यात खनिकर्म निधीमधून स्मशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पद्धत वापरण्यात यावी. यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे असे मुनगंटीवार म्हणाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक मोटघरे यांनी सादरीकरण केले. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत माहिती दिली. तसेच उपाययोजना सांगितल्या. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, सहसंचालक विद्यानंद मोटघरे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर मनपा आयुक्त पालीवाल, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.

उद्योगांत कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक प्रदूषके बाहेर पडतात. यातून हवा, पाणी, ध्वनी आणि जमीन यांचे प्रदुषण होते. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
 
महत्त्वाच्या बातम्या:

Nashik News:  गोदावरी नदी प्रदुषण करणाऱ्यांवर थेट कारवाई; केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget